Tuesday, November 26, 2024
Homeक्रीडाIPL 2023 Final वर पावसाचे सावट, सामना रद्द झाल्यास कोण ठरेल विजेता?

IPL 2023 Final वर पावसाचे सावट, सामना रद्द झाल्यास कोण ठरेल विजेता?

अहमदाबाद | Ahmedabad

आयपीएल टी-२० क्रिकेटच्या १६व्या हंगामाचा महाअंतिम सामना आज रविवारी खेळवला जाणार आहे. गतविजेत्यांना आपले जेतेपद टिकवून ठेवण्यासाठी आणि धोनीला एका सीझनच्या ब्रेकनंतर पुन्हा आयपीएल ट्रॉफी जिंकण्यासाठी आजचा सामना निर्णायक ठरेल. CSK व GT यांच्यापैकी कोणाचे स्वप्न पूर्ण होणार याकडे साऱ्यांचे लक्ष असेल.

- Advertisement -

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर GT आणि CSK आतापर्यंत फक्त एकदाच आमनेसामने आले आहेत, ज्यामध्ये गुजरातने विजय मिळवला आहे. आता रविवारी आयपीएल फायनलमध्ये या दोन संघांमधील आणखी एक रोमांचक लढत अपेक्षित आहे.

Rain Alert : ‘या’ जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी स्वर्ग मानली जाते. येथील सपाट खेळपट्टीवर फलंदाजी करणे सोपे आहे. या मैदानावर फलंदाज खूप धावा करतात. शुभमन गिलने हे गेल्या सामन्यात हे सिद्ध केले आहे. अहमदाबादच्या खेळपट्टीवर एकसमान उसळी आहे. त्यामुळे वेगवान गोलंदाजांना थोडीशी मदत मिळते.

आउटफिल्ड देखील खूप वेगवान आहे. आयपीएल 2023 मध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांची सरासरी धावसंख्या १८७ आहे. या सामन्यात नाणेफेक महत्त्वाची भूमिका बजावेल. नाणेफेक जिंकणारा संघ येथे प्रथम फलंदाजी करण्यास प्राधान्य देतो आणि जिंकतो, हे आतापर्यंत तरी दिसून आले आहे.

शाळेतील माधान्ह भोजनात साप निघाल्याने खळबळ, ५० मुलं हॉस्पिटलमध्ये दाखल

दरम्यान, या सामन्यावर पावसाचा धोका आहे. अहमदाबादमध्ये गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील क्वालिफायर 2 सामनाही पावसामुळे 45 मिनिटांसाठी खंडित झाला होता. नाणेफेक संध्याकाळी 7.00 ऐवजी 7.45 वाजता झाली, तर सामना रात्री 8.00 वाजता सुरू झाला. मात्र पूर्ण सामना खेळला गेला. चेन्नई आणि गुजरात यांच्यातील फायनलमध्येही पावसाचा धोका आहे.

या सामन्यात पाऊस पडल्यास आणि सामना रद्द झाल्यास काय होईल ते जाणून घेऊया. IPL Final साठी राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही, त्यामुळे पावसामुळे सामना रद्द करावा लागल्यास साखळी फेरीतील गुणांच्या आधारे विजयी संघ ठरवला जाईल. असे झाल्यास २० गुणांसह टॉपर राहिलेल्या गुजरात टायटन्सकडे जेतेपदाची ट्रॉफी कायम राहिल.

Accident News : पंढरपूरहून परणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; ३ ठार, ७ जण गंभीर जखमी

आज अहमदाबादमधील वातावरण कसं?

28 मे रविवारी अहमदाबाद कमाल तापमान 40 डिग्री सेल्सिअस असू शकते तर किमान तापमान 28 डिग्री असण्याचा अंदाज आहे. या दिवशी 16 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहू शकतात. रविवारी अहमदाबाद येथे पाऊस पडण्याची शक्यता खूपच कमी आहे.

गुजरात टायटन्स टीम – हार्दिक पंड्या (कर्णधार), ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), शुबमन गिल, विजय शंकर, अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, मोहम्मद शमी, नूर अहमद, मोहित शर्मा, जयंत यादव, जोशुआ लिटल, शिवम मावी, रविश्रीनिवासन साई किशोर, श्रीकर भारत, साई सुदर्शन, अल्झारी जोसेफ, प्रदीप सांगवान, मॅथ्यू वेड, दासून शनाका, ओडियन स्मिथ, दर्शन नळकांडे, उर्विल पटेल आणि यश दयाल.

चेन्नई सुपर किंग्स टीम – महेंद्रसिंह धोनी (कॅप्टन), डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, अंबाती रायडू, सुभ्रांशु सेनापति, मोईन अली, शिवम दूबे, राजवर्धन हंगरगेकर, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सेंटनर, रविंद्र जडेजा, कायले जेमिन्सन, निशांत सिंधू, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, मतीशा पाथिराना, सिमरजीत सिंह, दीपक चाहर , प्रशांत सोलंकी, महेश थीक्ष्णा, शेख रशीद, भगत वर्मा आणि अजय मंडल.

धक्कादायक! शूटिंग संपवून परतत असताना ट्रकने चिरडले, प्रसिद्ध अभिनेत्रीचा जागीच मृत्यू

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या