Tuesday, November 26, 2024
Homeक्रीडाIPL 2023 : मुंबईसमोर गुजरातचे आव्हान, अंतिम फेरीचे तिकीट कुणाला?

IPL 2023 : मुंबईसमोर गुजरातचे आव्हान, अंतिम फेरीचे तिकीट कुणाला?

अहमदाबाद | Ahmedabad

आयपीएल २०२३ च्या (IPL 2023) एलिमिनेटर लढतीत लखनऊ सुपरजायंट्स (Lucknow Super Giants) संघाविरुद्ध ८१ धावांनी दणदणीत विजय संपादन कररणाऱ्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाने आपला मोर्चा आता अहमदाबाद येथे वळवला आहे…

- Advertisement -

आयपीएल २०२३ चा कवालिफायर २ सामना खेळण्यासाठी शुक्रवारी २६ मे २०२३ रोजी मुंबई इंडियन्स आणि गुजरात एकमेकांच्या समोर येणार आहेत. सामन्यात विजय संपादन करणाऱ्या संघाला अंतिम फेरीचे तिकीट मिळणार आहे.

आयपीएल २०२३ मध्ये गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स तिसऱ्यांदा एकमेकांसमोर येत आहेत. आतापर्यंत झालेल्या २ साखळी सामन्यात दोन्ही संघांनी १-१ विजय संपादन केला आहे. हार्दिक पांड्याचा गुजरात टायटन्स सलग दुसऱ्या वर्षी अंतिम सामना खेळण्यासाठी सज्ज असणार आहे.

गौतमीचं आडनाव पाटील नव्हे तर…; पुन्हा नव्या वादाला फुटलं तोंड

तर रोहित शर्माचा मुंबई इंडियन्स सातवा अंतिम सामना खेळण्यासाठी सज्ज असणार आहे. गुजरात टायटन्स संघाला पहिल्या क्वालिफायर सामन्यात ४ वेळचा आयपीएल चॅम्पियन चेन्नई सुपरकिंग्ज संघाकडून १५ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे. या पराभवातून सावरलेला गुजरात टायटन्स मुंबई इंडियन्स संघाविरुद्ध आपला खेळ उंचावून अंतिम फेरीत दणक्यात आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी सज्ज असणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

New Parliament Inauguration : नवीन संसदेच्या उद्घाटनानिमित्त लॉन्च होणार 75 रुपयांचं नाणं, ‘अशी’ आहेत नाण्याची वैशिष्ट्ये

दुसरीकडे लखनऊवर विजय संपादन केलेला मुंबई इंडियन्स आत्मविश्वासाने आणि खास डावपेचांसह गुजरात संघावर आपला दबदबा कायम राखण्यासाठी सज्ज असणार आहे. दोन्ही संघांना विजय अनिवार्य असणार आहे. विजेत्या संघाचा सामना २८ मे २०२३ रोजी चेन्नई सुपरकिंग्ज संघाशी होणार आहे. तर पराभूत संघाचा आयपीएल २०२३ मधील प्रवास संपणार आहे. अंतिम फेरीच्या प्रवेशापासून दोन्ही संघ १ पाऊल दूर आहेत.

सलिल परांजपे, नाशिक.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या