Saturday, May 4, 2024
Homeक्रीडाआज राजस्थान रॉयल्ससमोर चेन्नई सुपरकिंग्जचे आव्हान

आज राजस्थान रॉयल्ससमोर चेन्नई सुपरकिंग्जचे आव्हान

चेन्नई | Chennai

आयपीएलमध्ये (IPL) बुधवारी १२ एप्रिल २०२३ रोजी चेन्नईच्या चेपॉक क्रिकेट मैदानावर राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाचा सामना चेन्नई सुपरकिंग्ज (Chennai Super Kings) संघाशी सायंकाळी ७:३० वाजता चेन्नईच्या एम ए चिदंबरम मैदानावर खेळवण्यात येणार आहे…

- Advertisement -

आयपीएल २०२३ मध्ये (IPL 2023) चेन्नई सुपरकिंग्ज संघाचे ३ सामन्यांमध्ये २ विजय आणि १ पराभवासह ४ गुण आहेत. दुसरीकडे राजस्थान रॉयल्स संघाच्या खात्यात ३ सामन्यांमध्ये २ विजय आणि १ पराभवासह ४ गुण आहेत. मात्र सरस धावगतीच्या बळावर राजस्थान रॉयल्स दुसऱ्या स्थानावर आहे. तर चेन्नई पाचव्या स्थानावर आहे. आयपीएल २०२३ मध्ये सतराव्या सामन्यादरम्यान दोन्ही संघ समोरासमोर असतील. चेन्नई संघाचे कर्णधारपद एम. एस. धोनीकडे असेल.

मोठी बातमी! म्यानमारमध्ये लष्कराकडून हवाई हल्ला; १०० जणांचा मृत्यू

तर राजस्थान रॉयल्स संघाची कर्णधारपदाची धुरा संजू सॅमसन सांभाळेल.चेन्नई सुपरकिंग्ज यंदाच्या हंगामात दुसरा सामना आपल्या घरच्या मैदानावर खेळणार आहे. चेन्नई सुपरकिंग्ज संघाची सुरुवात आयपीएलमध्ये निराशाजनक झाली आहे.

अहमदाबाद येथे गुजरात टायटन्स विरुद्ध झालेल्या सलामी सामन्यात चेन्नई सुपरकिंग्ज संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपरजायंट्स संघाविरुद्ध विजय संपादन केल्यामुळे चेन्नई सुपरकिंग्ज राजस्थान रॉयल्स संघाला पराभूत करण्यासाठी उत्सुक असणार आहे.

पुन्हा राजकीय भूकंप? १५ आमदार बाद होणार अन् अजित पवार भाजपसोबत जाणार…

दुसरीकडे राजस्थान रॉयल्स संघाने आपल्या सलामी सामन्यात सनराईझर्स हैद्राबाद संघाविरुद्ध ७२ धावांनी दणदणीत विजय संपादन करून दणक्यात सुरुवात केली होती. मात्र पंजाबकिंग्ज संघाविरुद्ध गुवाहाटी येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाचा ५ धावांनी निसटता पराभव झाला होता.

त्यानंतर दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्ध सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने शानदार विजय संपादन करत विजयी लय प्राप्त केली होती. दोन्ही संघांनी आपल्या अखेरच्या सामन्यात विजय संपादन केल्यामुळे विजयी हॅट्रिक करण्यासाठी दोन्ही संघ मैदानात उतरतील. मात्र राजस्थान रॉयल्सविरुद्ध लढतीपूर्वी चेन्नई सुपरकिंग्ज संघाच्या चिंतेत भर पडली आहे.

पंजाबच्या भटिंडा मिलिटरी स्टेशनवर गोळीबार; चार जणांचा मृत्यू

चेन्नई सुपरकिंग्ज संघाच्या गोलंदाजीचा आधारस्तंभ दीपक चाहर हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे पुढील काही सामन्यांना मुकणार आहे. याशिवाय अष्टपैलू बेन स्टोक्स आणि मोईन अली यांच्या सहभागावरही प्रश्नचिन्ह कायम आहे. त्यामुळे अंतिम ११ खेळाडूंमध्ये ४ परदेशी खेळाडू निवडताना कर्णधार धोनीची कसोटी लागणार आहे.

दोन्ही संघांची तुलना केल्यास राजस्थान रॉयल्स अधिक संतुलित दिसत आहे. संघाच्या गोलंदाजीत आणि फलंदाजीत चांगलाच समतोल आहे. संघात सलामीवीरांपासून मिडल ऑर्डर ते ९ व्या स्थानापर्यंत उत्कृष्ट फलंदाज आहेत. फिरकीची मदार अनुभवी आर अश्विन, आणि युझवेन्द्र चहलवर आहे. तेज गोलंदाजीत ट्रेंट बोल्ट, जेसन होल्डर हे प्रमुख गोलंदाज आहेत.

राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल; म्हणाले, हिंमत असेल तर…

चेन्नई आणि राजस्थान रॉयल्स संघांमध्ये आजवर एकूण २७ सामने झाले आहेत. यात चेन्नई सुपरकिंग्ज संघाने १५ तर राजस्थान रॉयल्स संघाने १२ विजय संपादन केले आहेत. आयपीएल २०२२ मध्ये दोन्ही संघांमध्ये एकमेव साखळी सामना झाला होता. या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने चेन्नईवर सरशी साधली होती. या पराभवाची परतफेड करण्यासाठी चेन्नई सज्ज असणार आहे.

सलिल परांजपे, नाशिक.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या