Wednesday, January 7, 2026
Homeक्रीडाIPL 2025 Final : 18 वर्षांनी विराट कोहलीची स्वप्नपूर्ती! 'बंगळुरू' IPL चा...

IPL 2025 Final : 18 वर्षांनी विराट कोहलीची स्वप्नपूर्ती! ‘बंगळुरू’ IPL चा नवा चॅम्पियन

मुंबई | Mumbai

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore) चौथ्या प्रयत्नात आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरण्यात यशस्वी ठरली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने अंतिम सामन्यात विजय (Won) मिळवत 18 वर्षांची प्रतिक्षा संपवली आहे. शेवटच्या क्षणांपर्यंत रंगलेल्या थरारक सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने आयपीएल 2025 (IPL 2025) चं विजेतेपद पटकावत इतिहास रचला आहे. आरसीबीने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये अंतिम सामन्यात पंजाब किंग्सवर 6 धावांनी मात करत आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरलं आहे.

- Advertisement -

विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वाखाली अनेक अपयश पाहिलेल्या या संघाने रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच ट्रॉफी जिंकली. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्ज यंदा पहिल्यांदाच फायनलमध्ये पोहोचून विजेतेपदाच्या खूप जवळ आला होता. मात्र अंतिम क्षणी आरसीबीने केलेल्या उत्कृष्ट खेळीने पंजाबचं स्वप्न भंगलं आहे. या सामन्यात पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आरसीबीने पंजाबसमोर 191 रन्सचं टार्गेट ठेवलं होतं. मात्र आरसीबीच्या गोलंदाजांसमोर पंजाबला 7 विकेट्स गमावून 184 धावा करता आल्या.

YouTube video player

दरम्यान, आरसीबीच्या (RCB) विजयानंतर विराट भावूक झाला. विराटला भावना अनावर झाल्या. तर दुसर्‍या बाजूला पंजाबची आयपीएल फायनलमध्ये पराभूत होण्याची 2014 नंतरची ही पहिली तर एकूण दुसरी वेळ ठरली. काइल जेमिसनने फिल साल्टला आऊट करून पंजाबचा निर्णय योग्य असल्याचे सिद्ध केले, साल्ट 16 धावा करून बाद झाला, तर संघाकडून विराट कोहलीने 43 धावा केल्या, मयंक अग्रवालने 17 चेंडूत 24 धावा केल्या, ज्यात 2 चौकार आणि एक षटकार होता.

ताज्या बातम्या

Accident News : दुचाकी अपघातात आरोग्य सेवकाचा मृत्यू

0
पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner रांजणगाव रोड (Ranjangaon Road) उपकेंद्र येथे आरोग्य सेवक (Health Worker) म्हणून कार्यरत असलेले राम गुणवंतराव जाधव (वय 29) यांचा मंगळवारी (दि.6)...