Saturday, January 24, 2026
Homeक्रीडाIPL 2025 : KKR vs GT - कोलकाता नाईट रायडर्ससमोर गुजरात टायटन्सचे...

IPL 2025 : KKR vs GT – कोलकाता नाईट रायडर्ससमोर गुजरात टायटन्सचे आव्हान; कुणाचे पारडे जड?

मुंबई | Mumbai

इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेमध्ये आज (सोमवारी) कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध गुजरात टायटन्स (Gujarat Titans vs Kolkata Knight Riders) सामना खेळविण्यात येणार आहे. हा सामना सायंकाळी ७:३० वाजता खेळविण्यात येणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाचे कर्णधारपद अजिंक्य रहाणेकडे (Ajinkya Rahane) तर शुभमन गिलकडे गुजरात टायटन्सचे कर्णधारपद असणार आहे.

- Advertisement -

आयपीएल क्रिकेट स्पर्धेमध्ये यंदाच्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्स संघाची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. कोलकाता नाईट रायडर्सने ७ सामने खेळले असून, ३ सामन्यात विजय संपादन केला आहे. तर ४ सामन्यात संघाचा पराभव झाला आहे. विशेष म्हणजे यंदाच्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सने ईडन गार्डन्स स्टेडियमवर ३ सामने खेळले असून, सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध एकमेव विजय (Won) संपादन केला आहे. मात्र,लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरूध्द कोलकाता नाईट रायडर्स संघाला पराभवाचा (Defeat) सामना करावा लागला आहे.

YouTube video player

आयपीएल २०२५ स्पर्धेचा निर्णायक टप्पा सुरू झाला आहे. उपांत्य फेरीत आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्स संघाला ७ पैकी ५ सामन्यात विजय संपादन करावा लागणार आहे.दुसरीकडे शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या गुजरात टायटन्सने यंदाच्या मोसमात चमकदार कामगिरी केली आहे. गुजरात टायटन्स ने मुंबई इंडियन्स, सनरायझर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स आणि राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू सारख्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील तगड्या संघांना पराभवाची धूळ चारून इतिहास रचला आहे.

दरम्यान, आयपीएल क्रिकेट स्पर्धेमध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स संघांमध्ये ४ सामने (Match) खेळविण्यात आले असून, हेड टू हेड आकडेवारी पाहिल्यास गुजरात टायटन्सने २ तसेच कोलकाता नाईट रायडर्स ने १ विजय संपादन केला आहे. तर १ सामना पावसामुळे (Rain) रद्द करण्यात आला आहे. विशेष म्हणजे कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर दोन्ही संघांमध्ये एकमेव सामना खेळविण्यात आला होता. या सामन्यात गुजरात टायटन्स ने कोलकाता नाईट रायडर्स संघाला पराभूत केले होते. या पराभवाची परतफेड करण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्स संघाला संधी असणार आहे.

ताज्या बातम्या

Kamaal R Khan : अभिनेता कमाल खानला ‘या’ तारखेपर्यंत पोलीस कोठडी;...

0
मुंबई | Mumbai अंधेरीतील ओशिवरामध्ये एका रहिवासी इमारतीवर रविवार (दि.१८) रोजी दोनदा बंदुकीच्या गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. यामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर याप्रकरणी अभिनेता...