Friday, April 25, 2025
Homeक्रीडाIPL 2025 : KKR vs PBKS - कोलकात्यासमोर पंजाब किंग्जचे आव्हान; कोण...

IPL 2025 : KKR vs PBKS – कोलकात्यासमोर पंजाब किंग्जचे आव्हान; कोण जिंकणार?

मुंबई | Mumbai

इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेमध्ये आज (मंगळवारी) मुल्लानपुर येथील महाराजा राजेवेंद्रसिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम चंदीगड येथे कोलकाता नाईट रायडर्स संघाचा सामना पंजाब किंग्ज संघाशी (Kolkata Knight Riders vs Punjab Kings) होणार आहे. भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७:३० वाजता सामना खेळविण्यात येणार आहे.

- Advertisement -

कोलकाता नाईट रायडर्स संघाचे कर्णधारपद अजिंक्य रहाणेकडे (Ajinkya Rahane) तर पंजाब किंग्ज संघाचे कर्णधारपद श्रेयस अय्यरकडे (Shreyas Iyer) असणार आहे.कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज प्रथमच या मैदानावर आमनेसामने येणार आहेत. आयपीएल क्रिकेट स्पर्धेमध्ये दोन्ही संघांमध्ये ३३ सामने खेळविण्यात आले असून, हेड टू हेड आकडेवारी पाहिल्यास कोलकाता नाईट रायडर्स संघाने पंजाब किंग्ज विरूध्द वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

कोलकाता नाईट रायडर्सने २१ तसेच पंजाब किंग्जने १२ सामन्यात (Match) विजय संपादन केला आहे. तसेच दोन्ही संघांमध्ये खेळविण्यात आलेल्या अखेरच्या ५ सामन्यांच्या निकालावर नजर टाकल्यास कोलकाता नाईट रायडर्सने ३ तर पंजाब किंग्जने २ सामन्यात विजय संपादन केला आहे.

पंजाब किंग्ज कोलकाता नाईट रायडर्स रेकॉर्डस्

कोलकाता सर्वाधिक धावसंख्या २६१
पंजाब किंग्ज सर्वाधिक धावसंख्या २६२

सर्वाधिक धावा
गौतम गंभीर ४९२ कोलकाता नाईट रायडर्स
रिधिमान सहा ३२२ धावा पंजाब किंग्ज.

सर्वाधिक बळी
सुनील नारायण ३३ बळी कोलकाता नाईट रायडर्स.
पियुष चावला १० बळी पंजाब किंग्ज.

बेस्ट बॉलिंग फीगर
५-१९ सुनील नारायण कोलकाता नाईट रायडर्स.
संदिप शर्मा ४-२५ पंजाब किंग्ज.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

शासकीय

Nashik News: शासकीय कार्यालकांकडे थकला कोट्यावधी रुपयांचा कर; मनपासमोर थकबाकी वसुलीचे...

0
नाशिक | प्रतिनिधी नाशिक मनपा कर विभाग सामान्य नागरिकांची घरपट्टीची थकबाकी वसूल करण्यासाठी त्यांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याची तयारी करीत आहे. मात्र दुसरीकडे शासकीय कार्यालयांकडेच मनपाची...