Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजIPL 2025 : मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार बदलला; 'या' खेळाडूवर सोपवली जबाबदारी

IPL 2025 : मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार बदलला; ‘या’ खेळाडूवर सोपवली जबाबदारी

मुंबई | वृत्तसंस्था | Mumbai

इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेमध्ये रविवारी (दि.२३)मार्च रोजी चेन्नई येथील एम ए चिदंबरम स्टेडियमवर मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरूध्द चेन्नई सुपरकिंग्ज संघात ( Chennai Super Kings Team) सामना खेळविण्यात येणार आहे. मात्र, मुंबई इंडियन्स संघाचा नियमित कर्णधार हार्दिक पांड्याला या सामन्यातून बाहेर बसावे लागणार आहे.

- Advertisement -

गतवर्षी २ सामन्यात षटकांची गती वेळेवर पूर्ण न केल्यामुळे हार्दिक पांड्यावर (Hardik Pandya) ही कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने नुकतीच आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा जिंकली होती. त्यामुळे रोहित शर्माकडे मुंबई इंडियन्स संघाचे नेतृत्व सोपविण्यात येईल अशी शक्यता सर्वत्र व्यक्त केली जात होती. मात्र, मुंबई इंडियन्सची धुरा सुर्यकुमार यादवकडे देण्यात आली आहे. मुंबई इंडियन्स संघाचा नियमित कर्णधार हार्दिक पांड्याने पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे.

दरम्यान, आयपीएल २०२३ मध्ये वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरूध्द कोलकाता नाईट रायडर्स संघात झालेल्या सामन्यात रोहित शर्माच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादवने कर्णधारपद (Captaincy) भुषविले होते. विशेष म्हणजे हार्दिक पांड्या आणि जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत मुंबई इंडियन्स संघ कशी कामगिरी करतो. यावर सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष असणार आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...