Wednesday, April 23, 2025
Homeक्रीडाIPL 2025 : आज MI vs SRH लढत; बाद फेरीचे आव्हान कायम...

IPL 2025 : आज MI vs SRH लढत; बाद फेरीचे आव्हान कायम राखण्यासाठी दोन्ही संघांना विजय अनिवार्य

मुंबई | Mumbai

आयपीएल २०२५ (IPL 2025) क्रिकेट स्पर्धेमध्ये आज (बुधवारी) मुंबई इंडियन्स (Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad) संघाचा सामना सनरायझर्स हैदराबाद संघाशी होणार आहे. हा सामना हैदराबाद येथील राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर सायंकाळी ७:३० वाजता खेळविण्यात येणार आहे. बाद फेरीच्या शर्यतीत आपले आव्हान कायम राखण्यासाठी दोन्ही संघांना विजय अनिवार्य असणार आहे. तर पराभूत संघाला स्पर्धेबाहेर पडावे लागणार आहे.

- Advertisement -

आयपीएल २०२५ स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे अव्वल ४ संघांमध्ये आपले स्थान निश्चित करण्यासाठी सर्व १० संघांमध्ये प्रचंड रस्सीखेच पहायला मिळत आहे. सनरायझर्स हैदराबाद संघाचे कर्णधारपद पॅट कमिन्सकडे (Pat Cummins vs Hardik Pandya) तर मुंबई इंडियन्स संघाची धुरा हार्दिक पांड्याकडे असणार आहे.

आयपीएल क्रिकेट स्पर्धेमध्ये पहिल्या टप्प्यात ५ सामन्यात १ विजय आणि ४ पराभव स्वीकारुन २ गुणांची कमाई केली होती. मात्र, दुसऱ्या टप्यात चेन्नई सुपरकिंग्ज, दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स विरूध्द विजय संपादन करून जबरदस्त कमबॅक केले आहे. त्यानंतर आता सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध सलग दुसरा विजय संपादन करून बाद फेरीत आपले स्थान जवळपास निश्चित करण्यासाठी मुंबई इंडियन्स संघ सज्ज असणार आहे.

दरम्यान, आयपीएल क्रिकेट स्पर्धेमध्ये दोन्ही संघांमध्ये २४ सामने खेळविण्यात आले असून, हेड टू हेड आकडेवारी पाहिल्यास मुंबई इंडियन्सने १४ तसेच सनरायझर्स हैदराबादने १० सामन्यात विजय संपादन केला आहे. राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर ९ सामने खेळविण्यात आले असून, सनरायझर्स हैदराबादने ५ तसेच मुंबई इंडियन्सने ४ सामन्यात विजय (Won) संपादन केला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

श्रीनगर

Pahalgam Terror Attack: श्रीनगर ते मुंबई विमान प्रवासाची तिप्पट भाडेवाढ; नेटीझन्सने...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीर खोऱ्यातून आप आपल्या राज्यात परतण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत असून विमान तिकीट आणि रेल्वेचे तिकीट काढण्यासाठी...