Wednesday, April 16, 2025
Homeक्रीडाIPL 2025 : RR vs DC : राजस्थान रॉयल्ससमोर दिल्ली कॅपिटल्सचे आव्हान;...

IPL 2025 : RR vs DC : राजस्थान रॉयल्ससमोर दिल्ली कॅपिटल्सचे आव्हान; कोण मारणार बाजी?

मुंबई | Mumbai

इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेमध्ये आज (बुधवारी) नवी दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर सायंकाळी ७:३० वाजता दिल्ली कॅपिटल्स संघासमोर राजस्थान रॉयल्स संघाचे (Rajasthan Royals vs Delhi Capitals) आव्हान असणार आहे. राजस्थान रॉयल्स संघाचे कर्णधारपद संजू सॅमसनकडे (Sanju Samson) तर दिल्ली कॅपिटल्स संघाची धुरा अक्षर पटेलकडे (Akshar Patel) असणार आहे.

- Advertisement -

यंदाच्या मोसमात राजस्थान रॉयल्स संघाची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. राजस्थान रॉयल्स संघाला कोलकाता नाईट रायडर्स, गुजरात टायटन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद विरूध्द पराभवाचा सामना करावा लागला आहे. मात्र, चेन्नई सुपरकिंग्ज आणि पंजाब किंग्ज विरूध्द राजस्थान रॉयल्सने विजय संपादन केला आहे. उपांत्य फेरीत आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी राजस्थान रॉयल्स संघाला ८ पैकी ७ सामन्यात विजय संपादन करावा लागणार आहे. तसेच आणखी एक पराभव झाल्यास स्पर्धेबाहेर पडावे लागणार आहे. याशिवाय इतर संघांच्या निकालावर नजर ठेवावी लागणार आहे.

दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्सने यंदाच्या मोसमात अक्षर पटेलच्या नेतृत्वाखाली खेळताना लखनौ सुपर जायंट्स, सनरायझर्स हैदराबाद, चेन्नई सुपरकिंग्ज, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरूध्द विजय संपादन करून दमदार सुरुवात केली होती. मात्र, रविवारी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरूध्द १२ धावांनी झालेल्या पराभवामुळे दिल्ली कॅपिटल्स संघाच्या विजयी मोहिमेला ब्रेक लागला आहे. त्यामुळे राजस्थान रॉयल्स संघाला पराभूत करून पाचवा विजय संपादन करण्याची संधी दिल्ली कॅपिटल्सकडे असणार आहे. तर विजयी हॅट्रिक करण्याच्या इराद्याने राजस्थान रॉयल्स मैदानावर उतरणार आहे.

दरम्यान, आयपीएल स्पर्धेमध्ये दोन्ही संघांमध्ये २९ सामने खेळविण्यात आले असून, राजस्थान रॉयल्सने १५ तसेच दिल्ली कॅपिटल्सने १४ सामन्यात विजय संपादन केला आहे. दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर ९ सामने खेळविण्यात आले असून, दिल्ली कॅपिटल्सने ६ तर राजस्थान रॉयल्सने ३ सामन्यात विजय संपादन केला आहे. यंदाच्या मोसमात दिल्ली कॅपिटल्स संघाला नवी दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर (Arun Jaitley Stadium) झालेल्या मुंबई इंडियन्स विरूध्द १२ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे आपल्या घरच्या मैदानावर पहिला विजय संपादन करण्याची संधी दिल्ली कॅपिटल्सकडे असणार आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Chhatrapati State Sports Award : भेंडा खुर्दच्या शंकर गदाईला ‘छत्रपती राज्य...

0
भेंडा | वार्ताहर नेवासा तालुक्यातील भेंडा खुर्द गावाचा सुपुत्र आणि प्रो-कबड्डी लीगमधील खेळाडू शंकर भीमराज गदाई याला महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाने सन २०२३-२४ साठी ‘छत्रपती...