Thursday, November 21, 2024
Homeक्रीडाIPL 2025 : दिल्ली कॅपिटल्ससोबत ऋषभ पंत कायम राहणार

IPL 2025 : दिल्ली कॅपिटल्ससोबत ऋषभ पंत कायम राहणार

मुंबई | Mumbai

आयपीएल (IPL) गव्हर्निंग काऊन्सिलची बैठक २८ सप्टेंबर रोजी पार पडली. या बैठकीत आयपीएल २०२५ (IPL 2025) मधील नव्या रिटेनशनच्या नियमांची घोषणा करण्यात आली. त्यामुळे आयपीएलमध्ये सहभागी झालेल्या सर्व १० संघांना आपल्या संघाची पुन्हा एकदा नव्याने बांधणी करावी लागणार आहे. आयपीएल संघांना आपल्या संघात ६ खेळाडू कायम ठेवता येणार आहेत.मात्र, यासाठी सर्व संघांना ७९ कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत. अशातच आता दिल्ली कॅपिटल्स संघ यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतला (Rishabh Pant) आपल्या संघासोबत कायम राखणार यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : भाजपला दे धक्का! इंदापुरात शरद पवारांनी भाकरी फिरवली; हर्षवर्धन पाटील ‘तुतारी’ फुंकणार?

गेल्या काही दिवसांपासून ऋषभ पंत दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाची साथ सोडून चेन्नई सुपरकिंग्ज संघात जाणार अशी शक्यता वर्तवली जात होती. चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंग धोनीच्या आयपीएल निवृत्तीनंतर चेन्नई सुपरकिंग्ज संघाला चांगला यष्टीरक्षक आणि कमी चेंडूत जास्त धावा करणाऱ्या यष्टीरक्षक फलंदाजाची आवश्यकता होती.त्यामुळे आयपीएल २०२५ मध्ये होणाऱ्या मेगा लिलावात ऋषभ पंतला खरेदी करेल, असे सर्वत्र बोलले जात होते. मात्र, दिल्ली कॅपिटल्स संघाचे सहमालक पार्थ जिंदाल यांनी ऋषभ पंत दिल्ली कॅपिटल्स संघासोबत असेल,हे स्पष्ट केले आहे. त्यामुळे सर्व अफवांना पूर्णविराम मिळाला आहे.

हे देखील वाचा : Women’s T20 World Cup : उद्या भारत-न्यूझीलंड भिडणार; कोण मारणार बाजी?

जिंदाल म्हणाले की, नुकतेच आयपीएल रिटेंनशनचे नवे नियम (New Rules) लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे जीएमआर समूह आणि क्रिकेट संचालक सौरव गांगुली यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. तसेच आमच्या संघात अक्षर पटेल, कुलदीप यादव , ट्रीसटन स्टबज, अभिषेक पोरेल, जेक फ्रेझर मॅग गर्क, मुकेश कुमार असे चांगले खेळाडू आहेत. मेगा लिलावापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या नियमानुसार आम्ही ६ खेळाडू कायम ठेवू शकतो, असे त्यांनी म्हटले.

सलिल परांजपे, नाशिक

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या