Tuesday, April 29, 2025
Homeब्रेकिंग न्यूजIPL 2025 : Vaibhav Suryavanshi ची वादळी शतकीय खेळी; दिग्गजांकडून पाठीवर...

IPL 2025 : Vaibhav Suryavanshi ची वादळी शतकीय खेळी; दिग्गजांकडून पाठीवर कौतुकाची थाप, कोण काय म्हणालं?

मुंबई | Mumbai 

आयपीएल २०२५ स्पर्धेत १४ वर्षीय राजस्थान रॉयल्सचा फलंदाज वैभव सूर्यवंशीने आपल्या तुफान फटकेबाजीने हवा केली आहे. काल (सोमवारी) जयपूर येथे राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामन्यात वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Suryavanshi) फक्त ३५ चेंडूत १०० धावा करत शतक पूर्ण केले. यासह, तो आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक करणारा भारतीय खेळाडू बनला आहे. त्याने आयपीएलमध्ये 37 चेंडूत शतक ठोकणाऱ्या युसूफ पठाणला मागे टाकले. वैभवने केलेल्या या आक्रमक खेळीचे भारतीय संघातील माजी खेळाडूंनी कौतुक केले असून, भारताचा कर्णधार रोहित शर्माने देखील इंस्टाग्राम अकाऊंटवरून स्टोरी शेअर करून त्याचे अभिंनदन केले आहे.

- Advertisement -

रोहित शर्माने (Rohit Sharma) वैभव सुर्यवंशीची वादळी खेळी पाहून इन्टाग्रामवर पोस्ट करत त्याचे कौतुक केले.’क्लास’ या एका शब्दात रोहित शर्माने आपल्या सर्व भावना मांडल्या आहेत. फक्त आयपीएलच नव्हे तर टी-ट्वेंटी इंटरनॅशनलमध्ये देखील कुणालाच १४ व्या वयात अशी कामगिरी करता आली नव्हती. वैभव सुर्यवंशीची खेळी पाहून मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडूलकर, युवराज सिंग, सुर्यकुमार यादव, एमएस धोनी, हरभजन सिंग, मयंक अग्रवाल, शिखर धवन, युसुफ पठाण यांनी देखील वैभवचे गोडवे गायले असून, त्याच्यावर जगभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Image

सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) एक्स अकाउंटवर वैभव सूर्यंवशीच्या वादळी खेळीचा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना सचिनने ट्विटमध्ये म्हटले की, वैभवचा निडर दृष्टिकोन, बॅट स्विंगची गती, चेंडूचा टप्पा कुठं पडणार हे ओळखण्याच कसब आणि चेंडू मारताना त्याने लावलेली ताकद हाच त्याच्या सुंदर खेळीचा मंत्र होता, अशा शब्दांत सचिन तेंडुलकरने त्याचे कौतुक केले आहे.

तसेच युसूफ पठाण (Yusuf Pathan) याने वैभव सूर्यंवशीचे अभिनंदन करतांना म्हटले की, वैभवला माझ्या शुभेच्छा आहेत. माझा विक्रम राजस्थानच्या ताफ्यातून खेळणाऱ्या खेळाडूने मोडला त्यामुळे हा विक्रम आणखी खास ठरतो, असे त्याने म्हटले आहे. युसूफ पठाण याने राजस्थानकडून खेळताना २०१० मध्ये ३७ चेंडूत शतक झळकावले होते. तर युवराज सिंगने (Yuvraj Singh) वैभव सूर्यंवशीच्या शतकी खेळीला दाद देत म्हटले की, “हा लहान मुलगा डोळ्याची पापणीही न लावता जगातील सर्वोत्तम गोलंदाजांचा सामना करताना पाहायला मिळतो. वैभव सूर्यंवशी हे नाव लक्षात ठेवा. तो अगदी बिनधास्त खेळताना दिसत असून, नव्या पिढीतील प्रतिभा अभिमानास्पद वाटते, अशा शब्दांत त्याने वैभव सूर्यंवशीच्या खेळीचे कौतुक केले आहे.

टी-२० मध्ये शतक करणारा सर्वात तरुण खेळाडू

वैभव सूर्यवंशी टी-२० मध्ये शतक ठोकणारा सर्वात तरुण फलंदाज बनला आहे. त्याने हे काम १४ वर्षे आणि ३२ दिवसांच्या वयात केले. यापूर्वी, विजय झोल १८ वर्षे ११८ दिवसांच्या वयात टी-२० क्रिकेटमध्ये शतक करणारा सर्वात तरुण फलंदाज ठरला होता. २०१३ मध्ये महाराष्ट्र विरुद्ध मुंबई यांच्यातील सामन्यात विजय झोलने ही कामगिरी केली होती. वैभव सूर्यवंशीने ३८ चेंडूत १०१ धावांची खेळी केली. यात ७ चौकार आणि ११ षटकारांचा समावेश होता. आयपीएल २०२५ मध्ये मेगा ऑक्शनमध्ये वैभव सूर्यवंशीला राजस्थान रॉयल्सने १ कोटी १० लाख बोली लावून विकत घेतले होते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Congress News : संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा, काँग्रेसचे पंतप्रधान मोदींना पत्र

0
दिल्ली । Delhi जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना...