मुंबई | Mumbai
इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेमध्ये आज (बुधवारी) बंगळूरु येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर गुजरात टायटन्स संघाचा सामना राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाशी होणार आहे. भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७:३० वाजता खेळविण्यात येणार आहे. गुजरात टायटन्स संघाचे कर्णधारपद शुभमन गिलकडे असणार आहे. तर रजत पाटीदारकडे बंगळूरु संघाचे कर्णधारपद असणार आहे.
विशेष म्हणजे रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली खेळताना बंगळूरु संघाने चेन्नई सुपरकिंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स संघाला घरच्या मैदानावर पराभवाचा धक्का देऊन इतिहास रचला आहे. आता बंगळूरु येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर आपला पहिला विजय संपादन करण्याची संधी बंगळूरुसंघाकडे असणार आहे. विशेष म्हणजे गुजरात टायटन्स संघाला पराभूत करून विजयी हॅट्रिक नोंदविण्याची संधी बंगळूरु संघाकडे असणार आहे.
दुसरीकडे गुजरात टायटन्स संघाला सलामीच्या लढतीत पंजाब किंग्ज कडून पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र मुंबई इंडियन्स विरूध्द ३६ धावांनी विजय संपादन करून गुजरात टायटन्स ने विजयी सलामी दिली आहे. आता बंगळूरु संघाला पराभूत करून दुसरा विजय संपादन करण्यासाठी गुजरात टायटन्स मैदानावर उतरणार आहे. विशेष म्हणजे आयपीएल क्रिकेट स्पर्धेमध्ये दोन्ही संघांमध्ये ५ सामने खेळविण्यात आले असून, हेड टू हेड आकडेवारी पाहिल्यास बंगळूरु संघाने ३ तसेच गुजरात टायटन्स ने २ सामन्यात बाजी मारली आहे.
दरम्यान, बंगळूरु येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर दोन्ही संघांमध्ये २ सामने खेळविण्यात आले असून, दोन्ही संघांनी १-१ विजय संपादन केला आहे. विशेष म्हणजे हा सामना बंगळूरु संघाच्या घरच्या मैदानावर खेळविण्यात येणार असल्याने बंगळूरु संघाला पराभूत करणे हे मोठे आव्हान गुजरात टायटन्स संघासमोर असणार आहे