Tuesday, March 25, 2025
Homeक्रीडाप्रतिक्षा संपली! IPL 2025 चे वेळापत्रक जाहीर, ‘या’ दिवशी होणार सुरुवात

प्रतिक्षा संपली! IPL 2025 चे वेळापत्रक जाहीर, ‘या’ दिवशी होणार सुरुवात

दिल्ली । Delhi

एकीकडे टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावसकर ट्रॉफी कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे क्रिकेट चाहत्यांना आयपीएल 2025 मेगा ऑक्शनचे वेध लागले आहेत.

- Advertisement -

मेगा ऑक्शन यंदा सौदी अरेबियातील जेद्दाह येथे 23 आणि 24 नोव्हेंबरला पार पडणार आहे. त्याआधी एक मोठी बातमी समोर आली आहे. मेगा ऑक्शनआधी आयपीएलचा 2025 चा हंगाम केव्हापासून सुरुवात होणार? यााबबत मोठी अपडेट समोर आली आहे.

एका मीडिया रिपोर्टनुसार, पुढील तीन सीझनच्या तारखा समोर आल्या आहेत. 2025 चा हंगाम 14 मार्च ते 25 मे या कालावधीत खेळवला जाईल, पुढील हंगाम 15 मार्चला सुरू होईल आणि अंतिम सामना 31 मे रोजी होईल. याशिवाय, आयपीएल 2027 ची तारीख देखील समोर आली आहे, जी 14 मार्चपासून सुरू होईल आणि 30 मे पर्यंत चालेल. या तारखांना लवकरच अधिकृत पुष्टी दिली जाऊ शकते.

गेल्या तीन मोसमाप्रमाणे आयपीएल 2025 च्या मोसमात एकूण 74 सामने खेळवले जाणार आहेत. त्यामुळे पुढील हंगामात सामन्यांची संख्या वाढवता येऊ शकते. आयपीएल 2026 मध्ये 84 सामने होतील आणि 2027 च्या हंगामात सामन्यांची संख्या 94 पर्यंत वाढवता येईल. सामन्यांच्या संख्येत वाढ होण्याचे कारण मीडिया अधिकार असू शकतात. जर आपल्याला आयपीएल 2024 आठवत असेल, तर ही स्पर्धा 22 मार्च ते 26 मे पर्यंत सुरू होती, ज्याच्या अंतिम फेरीत कोलकत्ता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

default-featured-image

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी तेलंगणा येथून...