मुंबई | Mumbai
भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) या दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य परिस्थितीमुळे आयपीएलचा (IPL) हंगाम मध्येच स्थगित करावा लागला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा आयपीएलचा उर्वरित हंगाम खेळवला जाणार आहे. बीसीसीआयकडून काल रात्री उशिरा याबाबतची घोषणा करण्यात आली.
त्यानुसार टाटा आयएपीएल २०२५ (Tata IPL 2025) चे उर्वरित सामने १७ मे २०२५ ते ३ जून या कालावधीत खेळवण्यात येणार आहेत.तसेच उर्वरित सामने हे एकूण ६ ठिकाणी खेळवण्यात येणार आहेत. त्यामुळे टाटा आयपीएलचे आता एकूण १७ सामने खेळवण्यात येणार आहे. नव्याने जाहीर केलेल्या वेळापत्रकात दोन डबर हेडरचाही समावेश असून, दोन्ही डबर हेडर हे दोन रविवारी खेळवण्यात येणार आहेत.
BCCI is pleased to announce the resumption of the TATA IPL 2025. A total of 17 matches will be played across 6 venues, starting May 17, and culminating in the final on June 3. The revised schedule includes two double-headers, which will be played on two Sundays. The playoffs are… pic.twitter.com/2QiA3cKhEg
— ANI (@ANI) May 12, 2025
दरम्यान, आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील उर्वरित सामने हे जयपूर, दिल्ली, लखनऊ, मुंबई, अहमदाबाद आणि बंगळुरु या सहा शहरांत खेळवले जातील. प्ले-ऑफ्स आणि अंतिम सामना कुठे खेळवला जाईल याबद्दल मात्र बीसीसीआयने (BCCI) अद्याप निर्णय घेतला नाही. तसेच आयपीएलचे उर्वरित सामने खेळवण्यात येणार असल्याने क्रिकेट चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्लेऑफचे सामने खालील तारखेला खेळविण्यात येणार
क्वालीफायर १ – २९ मे २०२५
एलिमिनेटर – ३० मे २०२५
क्वालिफायर २ – १ जून २०२५
फायनल – ३ जून २०२५