मुंबई | Mumbai
इंडियन प्रीमियर लीग (IPL) क्रिकेट स्पर्धेमध्ये आज बुधवारी दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाचा सामना मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाशी होणार आहे. हा सामना मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७:३० वाजता खेळविण्यात येणार आहे.मुंबई इंडियन्स संघाचे नेतृत्व हार्दिक पांड्याकडे (Hardik Pandya) तर अक्षर पटेलकडे (Axar Patel) दिल्ली कॅपिटल्स संघाचे कर्णधारपद असणार आहे.
विशेष म्हणजे गुजरात टायटन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज संघाने उपांत्य फेरीत आपला प्रवेश निश्चित केला आहे. मात्र चौथ्या स्थानासाठी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स (MI vs DC) संघांमध्ये कडवी झुंज आयपीएल क्रिकेट चाहत्यांना बघायला मिळण्याची शक्यता आहे. मुंबई इंडियन्सचा संघ सध्याच्या गुणतालिकेत १४ गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे.
तसेच दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्स संघाच्या खात्यात १३ गुण जमा असून दिल्ली कॅपिटल्स पाचव्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे उपांत्य फेरीत आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी दोन्ही संघांना विजय (Win) अनिवार्य असणार आहे. तसेच चौथ्या क्रमांकासाठी लखनौ सुपर जायंट्स शर्यतीत असल्याने मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघांपैकी एका संघाला स्पर्धेबाहेर पडावे लागणार आहे.
मुंबई इंडियन्स संघाला अखेरच्या सामन्यात गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाविरुद्ध ३ गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. तसेच दिल्ली कॅपिटल्स संघाला गुजरात टायटन्स विरूध्द १० गडी राखून पराभव स्वीकारावा लागला आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेमध्ये दोन्ही संघांमध्ये ३६ सामने खेळविण्यात आले असून, दिल्ली कॅपिटल्सने १६ तसेच मुंबई इंडियन्सने २० सामन्यात विजय संपादन केला आहे.
दरम्यान, नवी दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर (Arun Jaitley Stadium) पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्स विरूध्द १२ धावांनी पराभवाचा सामना केला होता. या पराभवाची परतफेड करण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स मैदानावर उतरणार आहे. मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) दोन्ही संघांमध्ये १३ सामने खेळविण्यात आले असून, मुंबई इंडियन्सने ९ तसेच दिल्ली कॅपिटल्सने ४ सामन्यात विजय संपादन केला आहे.