मुंबई | Mumbai
इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेमध्ये आज (मंगळवारी) नवी दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्स संघाचा सामना दिल्ली कॅपिटल्स (Kolkata Knight Riders and Delhi Capitals)) संघाशी होणार आहे. सायंकाळी ७:३० वाजता सामना खेळविण्यात येणार आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाचे कर्णधारपद अक्षर पटेलकडे तर अजिंक्य रहाणेकडे कोलकाता नाईट रायडर्स संघाचे कर्णधारपद असणार आहे.
कोलकाता नाईट रायडर्स संघाची कामगिरी यंदाच्या हंगामात निराशाजनक राहिली आहे. कोलकाता नाईट रायडर्सने ९ सामने खेळले असून, ३ सामन्यात विजय (Won) संपादन केला आहे. तर ५ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. १ सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे.
उपांत्य फेरीत आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्स संघाला ५ सामन्यात विजय संपादन करावा लागणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघांमध्ये आयपीएल क्रिकेट स्पर्धेमध्ये ३४ सामने खेळविण्यात आले असून, कोलकाता नाईट रायडर्सने १८ तर दिल्ली कॅपिटल्सने १५ सामन्यात विजय संपादन केला आहे. तसेच १ सामना पावसामुळे (Rain) रद्द करण्यात आला आहे.
दरम्यान, नवी दिल्ली (New Delhi) येथील अरुण जेटली स्टेडियम वर ११ सामने खेळले असून, दोन्ही संघांनी ५-५ सामन्यात विजय संपादन केला आहे. तर १ सामना रद्द करण्यात आला आहे. विशेष म्हणजे दोन्ही संघांमध्ये खेळविण्यात आलेल्या अखेरच्या ५ सामन्यांच्या निकालावर नजर टाकल्यास दिल्ली कॅपिटल्सने ३ तर कोलकाता नाईट रायडर्सने २ सामन्यात (Match) विजय संपादन केला आहे.