मुंबई | Mumbai
आज (शनिवारी) आयपीएलमध्ये (IPL) दुपारी पंजाब किंग्ज विरूध्द सनरायझर्स हैदराबाद (Punjab Kings vs Sunrisers Hyderabad) आणि सायंकाळी चेन्नई सुपर किंग्ज विरूध्द दिल्ली कॅपिटल्स (Chennai Super Kings vs Delhi Capitals) यांच्यात सामना होणार आहे. पहिला सामना न्यू चंदीगड येथील मुल्लानपुर मैदानावर होणार असून, दुसरा चेन्नई येथील एम ए चिदंबरम मैदानावर होईल.
पंजाब किंग्जचे कर्णधारपद श्रेयस अय्यरकडे असून, ईशान किशनकडे सनरायझर्स हैदराबादचे कर्णधारपद आहे. सनरायझर्सला अखेरच्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स विरूध्द पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर पंजाब किंग्ज संघाचा कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धचा अखेरचा सामना (Match) पावसामुळे रद्द झाला होता. त्यामुळे यंदाच्या हंगामात आपला तिसरा विजय संपादन करण्याची संधी पंजाब किंग्जकडे असणार आहे.
सनरायझर्स हैदराबादने कोलकाता नाईट रायडर्स विरूध्द विजय संपादन केला आहे. तर बंगळुरू आणि लखनौ सुपर जायंट्स विरूध्द पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे विजयी मार्गावर परतण्यासाठी सनरायझर्स हैदराबाद सज्ज असणार आहे. न्यू चंदीगड येथील मुल्लानपुर मैदानावर दोन्ही संघांमध्ये एकमेव सामना खेळविण्यात आला आहे. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने विजय संपादन केला होता. या पराभवाची परतफेड करण्याची संधी पंजाब किंग्जकडे असणार आहे.
दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधारपद ऋतुराज गायकवाड आणि दिल्ली कॅपिटल्सचे अष्टपैलू अक्षर पटेलकडे आहे. यंदाच्या हंगामात जबरदस्त लयीत असलेल्या दिल्ली कॅपिटल्स ने मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स संघाला पराभूत करून शानदार सुरुवात केली होती. मात्र गुजरात टायटन्सने अखेरच्या सामन्यात १ रन्सने थरारक विजय संपादन करून दिल्ली कॅपिटल्सच्या विजयात (Won) अडथळा निर्माण केला होता. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्ज संघाला पराभूत करून स्पर्धेतील आपला तिसरा विजय संपादन करण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स सज्ज असणार आहे.
दरम्यान, पंजाब किंग्ज, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स विरूध्द सलग ३ सामने पराभूत झाल्यानंतर चेन्नई सुपर किंग्ज संघासमोर स्पर्धेबाहेर पडण्याची नामुष्की ओढवली जाण्याची शक्यता आहे. चेन्नई येथील एम ए चिदंबरम मैदानावर ९ सामने खेळले असून, दिल्ली कॅपिटल्स ७-२ आशा फरकाने पिछाडीवर आहे.तसेच आयपीएल क्रिकेट स्पर्धेमध्ये ३१ सामने खेळले असून, चेन्नई सुपर किंग्ज १९-१२ फरकाने सरशी साधली आहे.




