Friday, September 20, 2024
Homeक्रीडाआयपीएल स्पर्धेच्या विजेतेपदासाठी कोलकाता-हैदराबाद भिडणार; कोणाचं पारडं जड? जाणून घ्या

आयपीएल स्पर्धेच्या विजेतेपदासाठी कोलकाता-हैदराबाद भिडणार; कोणाचं पारडं जड? जाणून घ्या

चेन्नई । Chennai

- Advertisement -

आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघामध्ये सामना खेळविण्यात येणार आहे. हा सामना रविवारी २६ मे २०२४ रोजी चेन्नई येथील एम ए चिदंबरम स्टेडियमवर सायंकाळी ७:३० वाजता खेळविण्यात येणार आहे. सनरायझर्स हैदराबाद संघाचे कर्णधारपद पॅट कमिन्सकडे असणार आहे. तर कोलकाता नाईट रायडर्स संघाचे कर्णधारपद श्रेयस अय्यरकडे असणार आहे.

२०१८ नंतर ६ वर्षाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर हैदराबाद संघाने तिसऱ्यांदा अंतिम सामन्यात प्रवेश निश्चित केला आहे. तर कोलकाता नाईट रायडर्स संघ २०१२, २०१४ आणि २०२१ मध्ये अंतिम सामन्यात पात्र ठरला होता. २०१२-२०१४ मध्ये गौतम गंभीरच्या नेतृत्वात चेन्नई सुपरकिंग्ज आणि पंजाब किंग्ज विरूध्द विजय संपादन करून विजेतेपद पटकावले होते. २०२१ मध्ये ईआॅन माॅरगनच्या चेन्नई सुपरकिंग्ज विरूध्द पराभव झाला होता.

दोन्ही संघांनी यंदाच्या हंगामात चमकदार कामगिरी केली आहे. यंदाच्या हंगामात दोन्ही संघांमध्ये तिसरा सामना खेळविण्यात येणार आहे. अंतिम सामन्यात साखळी फेरीच्या सामन्यात आणि क्वालिफायर १ मध्ये झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी हैदराबाद सज्ज असणार आहे. हैदराबाद संघांसाठी अभिषेक शर्मा, ट्रेवीस हेड ने सर्वाधिक धावा केल्या आहेत. सर्वाधिक बळी टी नटराजन याने घेतले आहेत. कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून अष्टपैलू खेळाडू सुनील नारायण, श्रेयस अय्यर, फील सॉल्ट यांनी सर्वाधिक धावा केल्या आहेत. सर्वाधिक बळी वरूण चक्रवर्ती याने पटकावले आहेत.

चेन्नईच्या खेळपट्टीवर आतापर्यंत ८४ आयपीएल सामने खेळविण्यात आले आहेत. प्रथम फलंदाजी करताना संघ ४९ धावांचा पाठलाग करताना संघ ३५ सामन्यात विजय संपादन केला आहे. पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या १६४ ईतकी आहे. दोन्ही संघांनी आपल्या अखेरच्या सामन्यात विजय संपादन केला असल्यामुळे अंतिम सामन्यात कोणता संघ वरचढ ठरतो? हे पाहाणे महत्वाचे असणार आहे. मात्र सामन्याच्या दिवशी ढगाळ वातावरण राहणार असून पावसाची शक्यता आहे. मात्र पावसामुळे सामना होऊ शकला नाही. तर राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.

सलिल परांजपे, नाशिक.

- Advertisment -

ताज्या बातम्या