Tuesday, January 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूजIPLचा  पंजाब विरुद्ध दिल्लीचा सामना थांबविला; मैदानात ब्लॅकआऊट 

IPLचा  पंजाब विरुद्ध दिल्लीचा सामना थांबविला; मैदानात ब्लॅकआऊट 

दिल्ली | वृत्तसंस्था
आज सायंकाळी पाकिस्तानने पंजाब, राजस्थान आणि जम्मू मध्ये ड्रोन हल्ले केले. भारतीय सैन्याने पाकिस्तानचे नापाक इरादे हाणून पाडले असून सर्व ड्रोन हल्ले पाडले आहेत. आयपीएल 2025 स्पर्धेतील 58वा सामना धर्मशाळेत सुरु आहे. हा सामना पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सुरु होता. मात्र पाकिस्तानने हल्ले सुरु केल्याने हा सामना थांबवण्यात आला आहे.
आयपीएल 2025 स्पर्धेतील 58वा सामना पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यानंतर थांबवण्यात आला आहे. पाकिस्तानकडून वारंवार हल्ले होत आहे. यामुळे खबरदारीचा इशारा म्हणून हा सामना थांबवण्यात आला आहे. हा सामना सीमेपासून 150 किमी दूर असलेल्या धर्मशाळेत सुरु होता. पण या मैदानावर हल्ला होऊ शकतो. या अनुषंगाने हा सामना थांबवण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

Nashik Crime : ‘त्या’ खुनामागे छेडछाड! तरुणाच्या हत्येनंतर जमावाची संशयिताच्या घरावर...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik पेठरोड परिसरातील (Peth Road Area) अश्वमेघ नगरात तरुणाची निघृण हत्या झाल्यानंतर या घटनेला रविवारी (दि. ४) भरदुपारी गंभीर वळण मिळाले....