Sunday, November 24, 2024
Homeक्रीडाआयपीएल होणार भारताबाहेर?

आयपीएल होणार भारताबाहेर?

मुंबई – आयपीएलच्या 13 व्या हंगामाबाबत प्रचंड उत्सुकता असताना आता एक नवी माहिती समोर आली आहे. आयपीएल मुंबईऐवजी भारताबाहेर होण्याची शक्यता बीसीसीआयच्या एका अधिकार्‍याने एएनआय वृत्तसंस्थेला दिली आहे. येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात आयपीएलचे आयोजन होऊ शकते. ही स्पर्धा युएई किंवा श्रीलंकेत होण्याची शक्यता आहे.

सध्या देशभरात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यातच मुंबईतही रेकॉर्डब्रेक आकडेवारी समोर येतेय. त्यामुळे ही स्पर्धा भारतात घेण्याची बीसीसीआयची कितीही इच्छा असली तरीही ती सध्या पूर्ण होऊ शकत नाहीी. त्यामुळे आयपीएलचा 13 वा हंगाम युएई किंवा श्रीलकेंत होण्याची शक्यता असल्याचे अधिकार्‍याने म्हटलं आहे. याबाबत अद्यापही ठाम निर्णय घेतला नसून मात्र शक्यता असल्याचे या अधिकार्‍याने सांगितले. भारतात ही स्पर्धा होईल अशी शक्यता वाटत नाही. एक किंवा दोन ठिकाणी सामने आयोजित करून खेळाडू आणि प्रेक्षकांसाठी सुरक्षित वातावरणात रिकाम्या स्टेडियममध्ये स्पर्धा होणे कठिण वाटते.

- Advertisement -

दरम्यान करोनामुळे मार्च महिन्यापासून क्रिकेट स्पर्धा बंद आहे. सध्या वेस्ट इंडिजचा संघ इंग्लंड दौर्‍यावर आहे. या दोन्ही देशांतील कसोटी मालिकेमुळे क्रिकेटच्या आयोजनाला बळ मिळेल. अशाच पद्धतीने मुंबईत सुरक्षित झोन करून आयपीएल स्पर्धा होऊ शकते, असा बीसीसीआयचा विचार असल्याचे वृत्त बुधवारी आले होते.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या