Saturday, April 26, 2025
Homeक्रीडाइलेक्शन टू सिलेक्शन! अशी करू शकता तुम्ही आयपीएल खेळाडूंची निवड

इलेक्शन टू सिलेक्शन! अशी करू शकता तुम्ही आयपीएल खेळाडूंची निवड

मुंबई : विवो आयपीएल स्पर्धा २००८ मध्ये सुरु झाल्यापासून आज भारतच नाही, तर संपूर्ण जगभरात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आतापर्यंत स्पर्धेचे १२ हंगाम पार पडले असून, डिसेंबर ते फेब्रुवारी या महिन्यात स्पर्धेचा लिलाव पार पडतो. आयपीएल स्पर्धेचा १३ वा हंगाम अजून उत्साहवर्धक व्हावा म्हणून मतदान निवड स्पर्धा होणार आहे.

ही स्पर्धा ७ डिसेंबर ते १८ डिसेंबर २०१९ पर्यंत होणार आहे. या गेममध्ये एकूण १० विजेते निवडले जाणार आहेत. या गेमची उत्सुकता चाहत्यांच्या मनात स्पष्ट्पणे जाणवत आहे. हे या स्पर्धेचे ३ रे वर्ष आहे लिलावात आपल्या आवडत्या खेळाडूला मतदान करण्याची संधी आहे.

- Advertisement -

विवो आयपीएल इलेक्शनस्टार.कॉम या संकेतस्थळावर आपण आपले मत नोंदवू शकता. ही स्पर्धा जाहीर होताच २४ तासात स्पर्धक संख्या ६ पट वाढून ३ लाखांवर जाऊन पोहोचली आहे. या स्पर्धेतून चाहत्यांना त्यांचा अनुभव शेअर करण्याची संधी मिळणार आहे. खालील १० खेळाडू कोणता संघ निवडेल याबाबत ही स्पर्धा आहे.

क्रिस मॉरिस, मिलर, गप्टिल, लीन, उथप्पा, लुईस, सॅम करण, मार्कस स्ट्रोइनीस, शिमरॉन हेटमायर, टीम साऊथी या खेळाडूंपैकी जास्तीत जास्त अचूक निवडणारे १० लकी विंनर्स निवडले जातील. यातील विजेत्यांना प्रत्येकी २ सीजन पास त्यांनी निवडलेल्या किंवा आवडत्या संघासाठी देण्यात येतील. हा लिलाव सोहळा सात भाषांमध्ये दाखवण्यात येईल.

सलिल परांजपे, देशदूत नाशिक

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : सिलेंडरचा स्फोट; आगीत दहा घरांचे नुकसान

0
अंबासन । वार्ताहर Ambasan बागलाण तालुक्यातील मोराणे सांडस येथील गावालगत असलेल्या पवार वस्तीत दुपारच्या वेळेस गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या भीषण आगीत दहा पेक्षा अधिक घरांचे...