Wednesday, February 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजAjit Pawar: IPS अंजना कृष्णा व्हिडीओ कॉल प्रकरण; अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया...

Ajit Pawar: IPS अंजना कृष्णा व्हिडीओ कॉल प्रकरण; अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया आली समोर, म्हणाले, “माझ्यासाठी कायद्याचे राज्य…”

मुंबई | Mumbai
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यातील संवादाचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झालेला आहे. संबधित व्हिडीओमध्ये अजित पवार हे अधिकारी अंजना कृष्णा यांना चांगलाच दम भरत असल्याचे दिसून येत आहे. आपले कर्तव्य बजावत असलेल्या या महिला अधिकारीला दम भरत असल्याने यावरून त्यांना लक्ष्य करण्यात आले. विरोधकांनी त्यांच्यावर चांगलीच टीका केली. महिला पोलीस अधिकाऱ्याचा असा अवमान योग्य नसल्याचेही अनेकांनी म्हटले. आता, अजित पवारांनी या व्हायरल व्हिडिओवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांसोबतच्या संवादाच्या संदर्भात काही व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, माझा उद्देश कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर त्या ठिकाणी परिस्थिती शांत रहावी आणि ती अधिक बिघडू नये याची काळजी घेण्याचा होता. आपल्या पोलीस दलाबद्दल तसेच धैर्याने आणि प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य बजावणाऱ्या महिला अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वोच्च आदर आहे. माझ्यासाठी कायद्याचे राज्य हेच सर्वात महत्त्वाचे आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. माझ्यासाठी कायद्याचे राज्य हेच सर्वात महत्त्वाचे आहे. मी पारदर्शक प्रशासकीय कारभारासाठी आणि बेकायदेशीर वाळू, माती, खडक उपशासह प्रत्येक बेकायदेशीर कृतीवर कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करण्यासाठी कटिबद्ध आहे.”

- Advertisement -

दरम्यान, या घटनेवरुन विरोधकांनी ट्विट करुन अजित पवारांना लक्ष्य केलं होतं, तर खासदार संजय राऊतांनी अजित पवारांची शिस्त आता कुठ गेली, असा सवाल उपस्थित केला होता. अखेर, सर्वच स्तरातून टीका होऊ लागल्याने अजित पवारांनी एक्सवर पोस्ट करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

YouTube video player

काय आहे प्रकरण?
सोलापूरमध्ये करमाळ्याच्या महिला आयपीएस अधिकारी डीएसपी अंजली कृष्णा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात फोन आणि व्हिडिओ कॉलवरून जोरदार वाद झाला. प्रत्यक्षात, डीएसपी अंजली कृष्णा रस्ते बांधकामासाठी बेकायदेशीर वाळू उत्खननाच्या तक्रारीवर कारवाई करण्यासाठी माढा तालुक्यातील कुर्डू गावात पोहोचल्या होत्या. गावकरी आणि घटनास्थळी असलेल्या अधिकाऱ्यामध्ये वाद झाला.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते बाबा जगताप यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना थेट फोन करून डीएसपी अंजली कृष्णा यांना फोन दिला. या संदर्भात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने थेट अजित पवार यांना फोन केल्याने हा गोंधळ निर्माण झाला आहे. या सर्व प्रकरणाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे. यावरुन अजित पवार यांच्यावर टीका केली जात आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Shirdi : शिर्डीत भाविकांची लूट करणार्‍या एजंटांविरुद्ध कडक कारवाईचे आदेश

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi साईनगरीत दर्शनासाठी येणार्‍या लाखो भाविकांची (Devotee) अडवणूक करून त्यांची आर्थिक पिळवणूक करणार्‍या एजंटांच्या (Agent) मुसक्या आवळण्यासाठी प्रशासनाने आता कंबर कसली आहे. भाविकांची...