Sunday, January 25, 2026
Homeराजकीय"तुरुंगात ३०० कोटी मागितले, हा माणूस..."; जालिंदर सुपेकरांवर सुरेश धसांचा खळबळजनक गौप्यस्फोट

“तुरुंगात ३०० कोटी मागितले, हा माणूस…”; जालिंदर सुपेकरांवर सुरेश धसांचा खळबळजनक गौप्यस्फोट

मुंबई । Mumbai

पैशासाठी सुनेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपांमुळे वादात सापडलेल्या पुण्यातील हगवणे कुटुंबाचे नातेवाईक असलेले आयपीएस अधिकारी जालिंदर सुपेकर हेदेखील अडचणीत आले आहेत. भाजप आमदार सुरेश धस यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

- Advertisement -

पेकर यांनी तुरुंगातील कैद्यांकडून ३०० कोटी रुपयांची मागणी केल्याचा दावा धस यांनी केला आहे. यापूर्वीही सुपेकर यांच्यावर हगवणे बंधूंना शस्त्र परवाना मिळवून देण्यासाठी मदत केल्याचा आणि वैष्णवी हगवणे यांच्या तक्रारीवर कारवाई न करण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप झाला होता. या सर्व प्रकरणांमुळे सुपेकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

YouTube video player

आमदार सुरेश धस यांनी सुपेकर यांच्यावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. “विशेष पोलीस महानिरीक्षक (आयजी) पदावर असलेला अधिकारी जर १ लाख रुपये रोख आणि ५० हजारांचा मोबाईल घेत असेल, तर यापेक्षा मोठे दुर्दैव काय असू शकते?” असा सवाल धस यांनी उपस्थित केला. तुरुंगातील कैद्यांकडून ३०० कोटी रुपये मागितल्याचा आरोपही त्यांनी सुपेकर यांच्यावर केला.

“कैद्यांनी मला सांगितले की, सुपेकर यांनी त्यांच्याकडे ३०० कोटी रुपयांची मागणी केली,” असे धस यांनी स्पष्ट केले. सुपेकर यांच्यावर नैतिकतेचा अभाव असल्याची टीकाही त्यांनी केली. “नातेवाईकाच्या सुनेकडून पैसे मागणे हा प्रकार खालच्या पातळीवरील आहे. सुपेकर यांच्यामध्ये नैतिकता नावाची गोष्ट उरलेली नाही,” असे धस यांनी ठणकावून सांगितले.

हगवणे कुटुंबावरही सुरेश धस यांनी जोरदार टीका केली आहे. या कुटुंबाकडे १५० कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचा दावा त्यांनी केला. “ही मालमत्ता आता जाळायची की पेटवायची? अशा लोकांना तुरुंगातून बाहेर आल्यानंतरही समाजाने स्वीकारू नये,” असे धस यांनी म्हटले आहे. हगवणे कुटुंबातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाने यापूर्वीच खळबळ उडवली होती. या प्रकरणात सुपेकर यांचे नाव समोर आल्यानंतर त्यांच्यावर कारवाई झाली होती.

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात जालिंदर सुपेकर यांचे नाव समोर आल्यानंतर त्यांची विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह व सुधार सेवा) या पदावरून बदली करण्यात आली होती. त्यांना उपमहासमादेशक (होमगार्ड) या पदावर पाठवण्यात आले आहे. मात्र, धस यांच्या नव्या आरोपांमुळे सुपेकर यांच्यावरील दबाव आणखी वाढला आहे. यापूर्वी त्यांच्यावर हगवणे बंधूंना शस्त्र परवाना मिळवण्यासाठी मदत केल्याचा आणि वैष्णवी यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप झाला होता.

 

ताज्या बातम्या

लालू यादवांनी RJD मध्ये केले मोठे बदल! कार्यकारी अध्यक्षपदी तेजस्वी यादव...

0
पाटणा । Patana बिहारच्या राजकारणात आणि विशेषतः राष्ट्रीय जनता दलात (राजद) आज एका नवीन पर्वाचा उदय झाला आहे. पक्षाचे युवा नेते तेजस्वी यादव यांची राजदच्या...