Saturday, May 4, 2024
Homeदेश विदेशडोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात इराकच्या कोर्टाकडून अटक वॉरंट जारी

डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात इराकच्या कोर्टाकडून अटक वॉरंट जारी

दिल्ली | Delhi

इराकच्या एका न्यायालयाने गेल्या वर्षी एका इराणी जनरल आणि एका प्रभावशाली इराणी नेत्याच्या हत्येप्रकरणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात गुरुवारी अटकेचे वॉरंट जारी केले आहे.

- Advertisement -

अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात जनरल कासिम सुलेमानी (Qassim Suleimani) आणि अबू माहदी अल मुहंदिस (Abu Mahdi al-Muhandis) यांच्या हत्येप्रकरणी बगदाद तपास कोर्टाच्या न्यायाधीशांनी वॉरंट जारी केल्याचे कोर्टाच्या मीडिया कार्यालयाने म्हटले आहे.

गेल्या वर्षी जानेवारीत इराणचा सर्वोच्च सैन्य कमांडर कासिम सुलेमानी इराकची राजधानी बगदाद येथे अमेरिकन ड्रोन हल्ल्यात मारला गेला होता. त्यानंतर अमेरिका आणि इराक यांच्यात मुत्सद्दी संकट उद्भवले होते आणि या दोघांमधील तणाव अजूनच वाढले. यानंतर इराणने इराकमधील अमेरिकन सैन्याच्या तळांवर लक्ष्य ठेवून क्षेपणास्त्र हल्ले केले. या प्रकरणाबाबत अमेरिकेच्या विरोधी पक्ष डेमोक्रॅट्सने असा आरोप केला होता की ट्रम्प यांनी इराकमध्ये इराणचा कमांडर जनरल सुलेमानी याच्यावर ड्रोन हल्ल्याची संसदेला माहिती न देता परवानगी दिली होती. आता याच हत्येच्या आरोपाखाली ट्रम्प यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे.

जनरल कासिम सुलेमानी आणि अबू माहदी अल मुहंदिस यांच्या निधनानंतर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनी (Ayatollah Ruhollah Khomeini) यांनी त्यांना शहीद असा दर्जा देत, या गोष्टीचा बदला घेण्याची मागणी केली होती. त्यावेळी अयातुल्ला खोमेनी यांनी ट्वीट करत, आम्ही अबू महदी आणि सुलेमानी यांच्या आत्म्यास श्रद्धांजली वाहतो. ते इस्लाममध्ये प्रशिक्षण घेतलेल्या व्यक्तीचे ते एक उदाहरण होते. ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य अल्लासाठी लढाईत घालवले असे म्हटले होते. दुसरीकडे, अमेरिकेच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा फार मोठा पराभव झाला आहे. मात्र आतापर्यंत ट्रम्प सतत निकालाला आव्हान देण्याचा प्रयत्न करीत होते. अखेर आता अमेरिकेचे आउटगोइंग राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, 20 जानेवारी रोजी जो बिडेन यांच्याकडे सत्ता हस्तांतरण होईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या