Friday, October 2, 2026
Homeक्राईमलोखंडी रॉड व काठ्यांनी हल्ला; 12 जणांवर गुन्हा दाखल

लोखंडी रॉड व काठ्यांनी हल्ला; 12 जणांवर गुन्हा दाखल

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

तालुक्यातील वरखेड येथे शेतजमिनीचा ताबा घेण्यासाठी सराईत गुंडांकडून लोखंडी रॉड व लाकडी काठ्यांसह हल्ला केल्याची घटना घडली असून नेवासा पोलिसांनी कृष्णा परदेशी सह 12 साथीदारांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी तिघांना अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक धनजंय जाधव यांनी दिली. या घटनेत जखमी झाल्याने नगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेले अजय रामकिसन नजन (वय 31), रा.वरखेड यांच्या जबाबावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

जबाबात म्हटले की, माझे वडील रामकिसन रघुनाथ नजन हे दारू पित असल्याने त्यांना फसवून सन 2022 च्या दरम्यान आमच्या गावातील गौरव राजेंद्र वाकचौरे यांनी आमची वरखेड गावचे शिवारातील शेत गट नंबर 159/2 हि शेत जमीन त्याचे नावावर करून घेतली. त्या बाबत आम्ही नेवासा कोर्टात गौरव राजेंद्र वाकचौरे यांच्यावर दावा दाखल केला आहे. म्हणून गौरव राजेंद्र वाकचौरे याने सदरची शेती परस्पर अमोल बाळासाहेब मारकळी, रा. नेवासा बुद्रुक याचे नावावर सन 2024 मध्ये करून दिली आहे. परंतु शेतीचा ताबा आमचा असून सध्या शेतात कपाशीचे पीक आहे. 20 सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास मी तसेच भाऊ, भावजय, माझी पत्नी असे शेतात काम करीत असताना तेथे अमोल बाळासाहेब मारकळी हा गैरकायद्याची मंडळी बिगर नंबरच्या ओमीनी कारमधून तसेच 3 ते 4 मोटारसायकल वरून असे एकत्रीत येऊन शेतीचा ताबा घेण्यासाठी येऊन कपाशी पिकाची नासधूस करून आम्ही शेतीचा ताबा देत नाही म्हणून त्याने त्याच्या हातातील लोखंडी गज हा मला जिवे मारण्याच्या उद्देशाने माझ्या डोक्यात मारून मला गंभीररित्या जखमी केले व भांडणाची सोडवासोडव करण्यास माझा भाऊ, भावजई, पत्नी हे आले असता त्यांना देखील त्याच्या हातातील लाकडी दांड्याने व लाथाबुक्क्याने बेदम मारहाण करून आम्हाला जखमी केले आहे.

आमच्या झालेल्या भांडणाचा माझा भाऊ विजय रामकिसन नजन याने व्हिडीओ काढला आहे. म्हणून माझी अमोल बाळासाहेब मारकळी रा. नेवासा, कृष्णा परदेशी, विकास घोरपडे, राहुल बंदीवान, दिगंबर म्हस्के, बंडू शिंदे, देविदास सीताराम मुखेकर तसेच अनोळखी तीन महिला व आठ ते दहा पुरुष यांच्याविरुद्ध माझी तक्रार आहे. या फिर्यादीवरून वरील आरोपींविरुद्ध नेवासा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 189(2), 191(2), 191(3), 190, 109, 118(2), 118(1), 115(2), 352, 351(2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक शैलेंद्र ससाणे पुढील तपास करत आहेत.

ताज्या बातम्या

इन्व्हेस्ट

‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’! १० लाख कोटींच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार

0
मुंबई प्रतिनिधीमहाराष्ट्राला देशातील अग्रगण्य औद्योगिक राज्य आणि देशाच्या औद्योगिक विकासाचे प्रमुख केंद्र बनविण्याच्या दिशेने ‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’ हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून...