Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्याIrshalwadi Landslide : इर्शाळवाडी दुर्घटनेतील मृतांची संख्या २२ वर; १०० हून अधिक...

Irshalwadi Landslide : इर्शाळवाडी दुर्घटनेतील मृतांची संख्या २२ वर; १०० हून अधिक लोकांची ओळख पटली

मुंबई | Mumbai

रायगड जिल्ह्यातील (Raigad District) खालापूर तालुक्यामधील (Khalapur Taluka) इर्शाळवाडी (Irshalwadi) येथे बुधवारी (दि.१९ जुलै) रोजी साडे दहा वाजेच्या सुमारास दरड कोसळल्याची (Landslide) दुर्दैवी घटना घडली होती. या दुर्घटनेत जवळपास ३० ते ४० घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली दबले गेले होते. तसेच या घरांमधील १०० पेक्षा अधिक लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती समोर आली होती.

- Advertisement -

“मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री…”; आमदार अमोल मिटकरींचे सूचक ट्वीट

त्यानंतर आता ही दुर्घटना घडून आज तीन दिवस झाले असून तिसऱ्या दिवशीही या ठिकाणी एनडीआरएफच्या (NDRF) जवानांकडून मातीच्या ढिगाऱ्याखाली दबल्या गेलेल्या लोकांचा शोध सुरु आहे. तर दुसरीकडे इर्शाळगड परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने मदतकार्यात प्रचंड अडथळे येत आहेत. मात्र, अशाही परिस्थितीत एनडीआरएफसह इतर संस्थांकडून याठिकाणी मदतकार्य सुरु असून दुर्घटनेतील मृत आणि जखमींचे कुटुंबीय आणि शेजारच्या गावातील नातेवाईक तीन दिवसांपासून या परिसरात तळ ठोकून आहेत.

इर्शाळवाडीतील आधार गमावलेल्या मुलांसाठी मुख्यमंत्री सरसावले ; घेतला मोठा निर्णय

तसेच या दुर्घटनेतील मृतांचा आकडा २२ वर पोहोचला असून यात ९ पुरुष, ९ महिला आणि चार बालकांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. तर गावात राहणाऱ्या ४८ कुटुंबातील २२८ नागरिकांपैकी १४३ व्यक्तींचा शोध घेण्यात आला असून आतापर्यंत ११० लोकांची ओळख पटली आहे. याशिवाय अजूनही ७० ते ८० लोकांचा (People) शोध लागलेला नसून ९८ जणांना वाचवण्यात यश आले आहे.

Rain Alert : राज्यात आज कुठे पडणार पाऊस? कोणत्या जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट? वाचा…

दरम्यान, ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी इर्शाळवाडीला भेट देऊन तेथील परिस्थितीची माहिती घेतली. यावेळी त्यांनी या दुर्घटनेत मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांशी देखील संवाद साधला. तसेच विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी देखील इर्शाळवाडीला भेट देऊन येथील लोकांशी चर्चा केली.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या