Sunday, November 24, 2024
Homeक्रीडाIPL चा नवा स्पॉन्सर Dream 11 संदर्भात जाणून घ्या सर्व माहिती

IPL चा नवा स्पॉन्सर Dream 11 संदर्भात जाणून घ्या सर्व माहिती

Dream 11 ने २२२ कोटी मोजत एका वर्षासाठी आयपीएल IPL 2020 ची स्पॉन्सरशिप मिळवली आहे. खरंतर VIVO सोबत IPL चा कॉन्ट्रँक्ट अजूनही कायम आहे. फक्त एका वर्षासाठी हा कॉन्ट्रँक स्थगित करण्यात आला आहे. दरम्यान Dream 11 संदर्भात सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे. काही जणांनी टि्वट करत म्हटले की, या कंपनीतही चीनचा पैसा आहे. परंतु ही कंपनी पुर्ण भारतीय आहे. या कंपनीच्या गुंतवणुकदारात चीनची टेंसेंट असल्याचे म्हटले जात आहे. Dream 11 मध्ये 10% टक्के गुंतवणूक टेंसेंटची आहे. Dream 11 ही गेमिंग अँप कंपनी म्हणून प्रसिद्ध झाली. Dream 11 ची पेरेंट कंपनी स्पोर्टा टेक्नॉलजीज प्राइवेट लिमिटेड मुंबईत रजिस्टर आहे.

Dream 11 करणार IPL2020 स्पॉन्सर !

- Advertisement -

2008 मध्ये कंपनीची स्थापना

ड्रीम स्पोर्ट्सची स्थापना 2008 मध्ये झाली होती. कंपनीचे सीईओ आणि सहसंस्थापक हर्षित शाह आहेत. तर भावित सेठ हे सीओओ आहे. चीफ मार्केटिंग ऑफिसर विक्रांत मुदलियर आणि चीफ इन्फर्मेशन ऑफिसर अभिषेक रवी आहेत.

धोनी नाव ब्रँड अँबेसिडर

कंपनीने महेंद्रसिंह धोनीला ब्रँड अँबेसिडर केले आहे. तसेच पहिल्यांदा फँटसी हॉकी लाँच केली आहे. 2019 मध्ये याची संख्या 7 कोटींवर पोहोचली होती. पहिल्यांदा फँटसी व्हॉलीबॉल लाँच केले. तसेच 20 हून अधिक सेलिब्रिटी क्रिकेटपटूंसोबत करार केला आहेत. Dream 11 एंड्रॉयड व आयओएसवर आहे. हे अँप 106MB चे आहे. त्याचे डाउनलोड कोटीत आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या