Tuesday, June 3, 2025
Homeब्रेकिंग न्यूजचाकणकर कोण आहे? रश्मिका मंदाना आहे का? सुषमा अंधारेंची रुपाली चाकणकरांवर खोचक...

चाकणकर कोण आहे? रश्मिका मंदाना आहे का? सुषमा अंधारेंची रुपाली चाकणकरांवर खोचक टीका

मुंबई | Mumbai
आपल्यावर टीका केल्याने विरोधकांना प्रसिद्धी मिळते असे वक्तव्य राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी केलं होतं. त्यावर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी जोरदार पलटवार केला. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मंगळवारी मुंबईत राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली. यावेळी रोहिणी खडसे, सुषमा अंधारे, किशोरी पेडणेकर, विद्या चव्हाण, ज्योती गायकवाड यांचा या शिष्टमंडळात समावेश होता. यावेळी वैष्णवी हगवणे प्रकरण हे सीआयडीकडे वर्ग करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी सुषमा अंधारे बोलत होत्या.

- Advertisement -

राज्यात महिलांवरील अत्याचार, वैष्णवी हगवणे प्रकरण, महिला आयोगाची निष्क्रियता आणि इतर मुद्यांवर महाविकास आघाडीतील महिला नेत्यांच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांशी चर्चा करताना सुषमा अंधारे यांनी विविध प्रश्नांना उत्तरे दिली. त्यावेळी त्यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

चाकणकर रश्मिका मंदाना आहेत का?
विरोधक प्रसिद्धी मिळवण्यासाठी माझ्यावर आणि महिला आयोगावर टीका करतात, या रुपाली चाकणकर यांच्या वक्तव्याविषयी सुषमा अंधारे यांना विचारण्यात आले. त्यावर सुषमा अंधारे यांनी म्हटले की, रुपाली चाकणकर कोण आहेत? चाकणकर रश्मिका मंदाना आहेत की स्मृती इराणी आहेत? त्या कोणत्या क्षेत्रातील सुप्रीमो आहेत. राजकारण, बॉलीवूड की प्रशासन कशातील सुप्रीम आहेत, की त्यांच्यावर बोलल्याने प्रसिद्धी वगैरे मिळते. काही लोकांना फारच मोठे गैरसमज असतात. त्यांनी या अंधश्रद्धेतून जितक्या लवकर शक्य तितक्या लवकर बाहेर यावे. रुपाली चाकणकर यांचे तत्परतेने पुढे येणारे लाडके बंधू सुनील तटकरेंनी चाकणकरांच्या मनातील गैरसमज दूर करण्यासाठी प्रयत्न करावा. चाकणकरांवर बोलण्याशी आम्हाला काहीही देणेघेणे नाही. चाकणकर हा अत्यंत छोटा विषय आहे. लाडकी बहीण योजनेचा निधी, ड्रग्स प्रकरण, वैष्णवी हगवणे प्रकरण, बेपत्ता होणाऱ्या महिलांचे प्रकरण आदींवर चर्चा झाली असल्याचे सुषमा अंधारे यांनी म्हटले.

आज राज्यपालांसोबत झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यपालांकडे आम्ही लाडकी बहीण, ड्रग्ज, हगवणे प्रकरणाबाबत चर्चा केली. हगवणे प्रकरणात राजकीय हस्तक्षेप होत आहे.निलेश चव्हाण, जालिंदर सुपेकर यांची चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली. लाडकी बहीण योजनेतंर्गत निधी देण्यासाठी सारथी, बार्टी, महाज्योतीच्या निधीसोबत इतर खात्याचा निधी वळवला जात असल्याची बाब राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिली असल्याचे अंधारे यांनी सांगितले.

मविआच्या नेत्यांचे एकमत झाले आहे की, महिला आयोगावर पूर्णवेळ काम करणारी अध्यक्षा द्या. पार्टी कार्यालयात जनता दरबार भरवणारी महिला काम करु शकत नाही. विशेषत: ज्यांना कायद्याचा परीघ माहिती असणारी महिला आयोगाच्या अध्यक्षपदी हवी. विद्यमान अध्यक्षा आहेत, त्यांनी कुठलीही कायद्याची पदवी घेतलेली नाही. त्यामुळे त्यांना कायदा कळत नाही. ईमेल पाठवण्याला त्या स्यूमोटो म्हणतात, स्यूमोटो कसा करतात त्यांना कळत नाही, याकडे सुषमा अंधार यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. यावर आता रुपाली चाकणकर काय प्रत्युत्तर देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

महिला आयोगावर पूर्णवेळ व्यक्तीची नियुक्ती करावी
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी सांगितले की, महिला आयोग पक्षपातीपणाने वागत असल्याचे राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिले. महिला आयोगावर पूर्णवेळ व्यक्तीची नियुक्ती करावी, वैष्णवी हगवणे प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवावा अशी मागणी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून राजकीय हस्तक्षेप होत असल्याचेही रोहिणी खडसे यांनी सांगितले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

राष्‍ट्रभाषा

भारताची राष्‍ट्रभाषा कोणती?कनिमोळींच्या उत्तराने सभागृहात एकच टाळ्यांचा कडकडाट

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi दहशतवादाविरुद्ध आंतरराष्ट्रीय पाठिंबा मिळविण्यासाठी भारताने अनेक सर्वपक्षीय शिष्टमंडळे विविध देशात पाठवली आहेत. पाकिस्तानचा दहशतवादाचा चेहरा जगासमोर टराटरा फाडण्यासाठी भारताने...