Monday, January 19, 2026
Homeब्रेकिंग न्यूजMalegaon MC Election : मालेगाव महापालिकेत इस्लाम पार्टी-एमआयएम-काँग्रेस युतीचा महापौर होणार?

Malegaon MC Election : मालेगाव महापालिकेत इस्लाम पार्टी-एमआयएम-काँग्रेस युतीचा महापौर होणार?

मालेगाव | प्रतिनिधी | Malegaon

शहराच्या विकासासाठी एमआयएम व काँग्रेसने सोबत येण्याचे आवाहन इस्लाम समाजवादी पार्टीतर्फे करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर सर्वांगीण विकासाबरोबर जातीयवाद्यांपासून शहरास वाचविण्याची इस्लाम पार्टीची भूमिका प्रामाणिक असेल तर त्यांच्यासोबत महानगरपालिकेत स्थापन करण्याच्या सत्ता प्रस्तावावर चर्चा करण्यास एमआयएमची तयारी असल्याचे सांगत आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद (MLA Maulana Mufti Mohammad) यांनी शिवसेना-भाजप सोबत कुठल्याही परिस्थितीत एमआयएम सत्तेत सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट केले.

- Advertisement -

महानगरपालिका निवडणुकीचे निकाल घोषित झाल्यानंतर इस्लाम पार्टीचे (Islam Party) ३५ तर समाजवादी पार्टीचे ५ नगरसेवक निवडून आल्याने सत्तेच्या समीप इस्लाम-समाजवादी आघाडी पोहचली आहे. शहर विकासासाठी एमआयएम आमदार मौलाना मुफ्ती व काँग्रेस महानगरप्रमुख एजाज बेग यांनी सोबत येण्याचे आवाहन इस्लाम व समाजवादी पार्टीच्या नेत्यांतर्फे करण्यात आले. तसेच, या संदर्भात काँग्रेसबरोबर (Congress) आघाडीच्या नेत्यांची बैठकांद्वारे चर्चांना देखील प्रारंभ करण्यात येऊन काँग्रेसचा सत्तेतील सहभागाबद्दलचा प्रस्ताव समजून घेण्यात आला आहे.

YouTube video player

हे देखील वाचा : Nashik Election Results 2026 : प्रभाग निहाय पक्षीय विजयी उमेदवारांची यादी; वाचा सविस्तर

विकासाच्या मुद्यावरच काँग्रेस सत्तेत सहभागी होण्याची भूमिका घेवू शकते असे वक्तव्य नुकतेच महानगरप्रमुख नगरसेवक एजाज बेग यांनी केले होते. त्यामुळे बहुमतासाठी आवश्यक असलेला ४३ जादुई आकडा गाठण्यास इस्लाम पार्टीला यश येण्याची शक्यता निर्माण झाली असल्याने इस्लाम पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, इस्लाम-समाजवादी आघाडीच्या नेत्यांतर्फे विकासासाठी सोबत येण्याचे आवाहन मौलाना मुफ्ती व एजाज बेग यांना केले गेल्याच्या पार्श्वभूमीवर एमआयएम आमदार मौलाना मुफ्ती यांनी पत्रकार परिषद घेत पक्षाची भूमिका स्पष्ट केली. यावेळी एमआयएम माजी महापौर अब्दुल मालिक व डॉ. खालीद परवेज हे नेते उपस्थित होते. मनपा निवडणु‌कीत एमआयएमला विजयाचा पूर्ण विश्वास होता. मात्र, निवडणुकीच्या निकालानंतर समोर आलेली परिस्थिती अनाकलनीय असल्याचे स्पष्ट करत आमदार मुफ्ती पुढे म्हणाले, विकासासाठी मी व एजाज बेग यांनी सोबत येण्याचे आवाहन आघाडीच्या नेत्यांतर्फे करण्यात आले होते. या प्रस्तावाचा आम्ही विचार केला आहे. सर्वांगीण विकासाबरोबर जातीयवाद्यांपासून शहरास हे वाचविणार असतील तर आम्ही त्यांच्या प्रस्तावावर निश्चित त्यांच्याशी चर्चा करण्यास तयार असल्याचे स्पष्ट केले.

सत्ता स्थापनेसाठी एमआयएम बिनशर्त पाठींबा देवू शकणार नसल्याचे स्पष्ट करत आमदार मौलाना मुफ्ती पुढे म्हणाले, एमआयएम पक्षाचे २१ नगरसेवक त्यांच्या प्रभागात विकासाच्या मुद्यावरच निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रभागात विकासाची कामे झाली पाहिजे, यासह इतर अनेक गोष्टी आहेत, इस्लाम पार्टीचे नेते जनाधार मिळाला असल्याचे सांगत असले तरी या निवडणुकीत एमआयएमला १ लाख १७ हजार ५०० च्या वर मते मिळाली आहेत. तर इस्लाम पार्टी आघाडीस १ लाख ७ हजार व काही मते मिळाली आहेत. इस्लाम पार्टीच्या जागा जास्त आल्या असल्या तरी मिळालेली मते पाहता जनाधार एमआयएमबरोबर असल्याचे निकालावरून स्पष्ट होते. त्यामुळे सर्वांगीण विकास व शहरास जातीय वाद्यांपासून वाचविण्याची भूमिका इस्लाम पार्टीची प्रामाणिक असेल तर एमआयएम त्यांच्या प्रस्तावावर चर्चा करण्यास तयार आहे व प्रस्तावावर योग्य चर्चा झाल्यास पाठिंब्याच्या संदर्भात पक्षाच्या वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे आमदार मौलाना मुफ्ती यांनी स्पष्ट केले.

हे देखील वाचा : Malegaon MC Election Results : मालेगावात प्रभाग क्रमांक १ ते २१ मध्ये कोणता पक्ष ‘धुरंधर’; विजयी उमेदवारांची यादी वाचा सविस्तर

शिवसेना पक्षप्रमुखांचे आदेशाचे पालन करू

शिवसेनेच्या नवनिर्वाचित १८ नगरसेवकांची काल शिवसेना संपर्क कार्यालयात बैठक पार पडली. शिक्षणमंत्री दादा भुसे हे जो निर्णय घेतील त्याचे पालन करण्याची ग्वाही नगरसेवकांतर्फे दिली गेली. यावेळी मंत्री भुसे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो आदेश देतील त्याचे पालन येथे केले जाणार असल्याचे स्पष्ट केले. नवनिर्वाचित नगरसेवकांचे गझेट झाल्यानंतर गटाची स्थापना केली जाईल. त्यानंतर शहरातील स्थानिक राजकीय परिस्थितीची माहिती वरिष्ठ नेत्यांना कळवली जाईल. यानंतर पक्षप्रमुख जो आदेश देतील त्याचे पालन येथे केले जाणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख अॅड. संजय दुसाने यांनी दिली. बैठकीस ज्येष्ठ नेते मनोहर बच्छाव यांच्यासह नाचही प्रभागातील पक्ष निरीक्षक उपस्थित होते.

एमआयएम-काँग्रेसबरोबर इस्लामची चर्चा

महानगरपालिकेत प्राप्त जनाधारामुळे महापौर इस्लामचाच राहणार असल्याचे स्पष्ट आहे. विकासाच्या मुद्यावर सोबत येण्याची भूमिका घेतल्याने काँग्रेसबरोबर त्यांनी दिलेल्या प्रस्तावावर चर्चा सुरू आहे. एमआयएमबरोबर देखील इस्लाम व समाजवादी पार्टीच्या चार सदस्यांची कमेटी चर्चा करून त्यांचा प्रस्ताव समजून घेणार आहेत. आम्ही प्रस्ताव दिला होता तो त्यांनी कबुल केला आहे. त्यामुळे आमची कमिटी देखील एमआयएमच्या पाठींब्याबाबतच्या प्रस्तावास समजून घेणार असल्याचे समाजवादी पार्टीचे नेते मुस्तकीन हिग्रेटी यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

Kolhapur Municipal Election : कोल्हापूरात काँग्रेस, शिंदे सेना एकत्र येण्याची शक्यता;...

0
मुंबई । Mumbai कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून, येथील राजकीय वातावरण आता महापौर निवडीच्या वळणावर येऊन ठेपले आहे. ८१ जागांच्या या महापालिकेत सत्तेसाठी...