नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमधील एका शिया मशिदीत (इमांबरा) आज (6 फेब्रुवारी) नमाज पढत असताना आत्मघातकी हल्ला झाला. पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनच्या वृत्तानुसार, या हल्ल्यात १५ जणांचा मृत्यू झाला आणि ८० जण जखमी झाले. जखमींना जवळच्या तीन हॉस्पिटल्समध्ये दाखल करण्यात आलय. रिपोर्टनुसार जखमींना पाकिस्तानच्या इस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायसेज (पीआयएम) आणि सीडीए हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे.
शुक्रवारच्या नमाजावेळी इस्लामाबादच्या कासर-ए-खदिजातुल कुबरा शिया मशिदीत आत्मघातकी स्फोट झाला आहे. ज्यात अनेक लोक मारले गेलेत. या घटनेनंतर इस्लामाबादमध्ये इमर्जन्सी लागू करण्यात आली आहे. एका व्यक्तीने मशिदीच्या गेटवर येऊन स्वत:ला बॉम्बने उडवल्याची माहिती काही रिपोर्टमधून समोर आली आहे. स्फोटानंतर, इस्लामाबाद पोलिस प्रमुखांनी शहरात आणीबाणी जाहीर केली. मृतांची संख्या वाढू शकते अशी अधिकाऱ्यांना भीती आहे.
पाकिस्तानी मंत्र्याकडून घटनेचा निषेध
पाकिस्तानी सरकारचे मंत्री डॉ. तारिक फजल चौधरी यांनी सोशल मीडियावर लिहिले की, “मी इस्लामाबादमधील स्फोटाचा तीव्र निषेध करतो. जीवितहानीमुळे मला दुःख झाले आहे.” अशा दहशतवादी घटनांमुळे देश आणि तेथील लोकांचे मनोबल खचू शकत नाही. आपण सर्वांनी शांतता, सहिष्णुता आणि स्थिरतेसाठी एकत्र आले पाहिजे आणि कायदा अंमलबजावणी संस्थांसोबत खंबीरपणे उभे राहिले पाहिजे.
पिआयएमएसच्या कार्यकारी संचालक (ईडी) यांच्या सूचनेनुसार रुग्णालयात आणीबाणी लागू करण्यात आली आहे. मुख्य आपत्कालीन, ऑर्थोपेडिक, बर्न सेंटर आणि न्यूरोलॉजी विभाग सक्रिय करण्यात आले आहेत. जखमींना पिआयएमएस आणि पॉलीक्लिनिकमध्ये दाखल करण्यात येत आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





