Saturday, July 27, 2024
Homeदेश विदेशइसिसला दक्षिण भारतातील जंगलात उभारायचा होता प्रांत

इसिसला दक्षिण भारतातील जंगलात उभारायचा होता प्रांत

नवी दिल्ली –

भारताच्या दक्षिणेकडील जंगल प्रदेशात स्वतंत्र असा प्रांत उभारण्याची जबाबदारी इसिस या जहाल दहशतवादी संघटनेने

- Advertisement -

अल् हिंद या भारतातील गटाकडे सोपवली होती, अशी धक्कादायक माहिती राष्ट्रीय तपास संस्था अर्थात् एनआयएच्या आरोपापत्रातून समोर आली आहे.

कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेश आणि केरळ या राज्यांमधील जंगलांची यासाठी निवड करण्यात आली होती. मागील वर्षीपासून यासाठी हालचाली सुरू झाल्या होत्या. दक्षिण भारताला देशापासून तोडणे आणि जंगलात आपले राज्य स्थापन करायचे, असा हा व्यापक कट होता, असा दावाही यात अटकेत असलेल्या इसिस अतिरेक्यांच्या कबुलीजबाबातून करण्यात आला. एनआयएने 14 जुलै रोजी इसिसच्या एकूण 17 अतिरेक्यांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. बंगळुरू आणि कुड्डालोर येथील इसिसच्या मेहबूब पाशा आणि खाजा मोईदिन या दोन बड्या अतिरेक्यांनी यासाठी काही सदस्यांची भरती करून, गट स्थापन केला होता. दक्षिणेतील जंगलात इसिसला वेगळा प्रांत हवा आहे, त्यासाठी एक मोठी संघटना उभी करण्याची जबाबदारी या दोघांनी त्यांच्यावर सोपवली होती. त्यांना शस्त्र, दारुगोळा आणि मोठ्या प्रमाणात स्फोटकेही उपलब्ध करून दिली होती. शक्तिशाली आयईडी तयार करून, जास्तीतजास्त लोक मरतील, अशा ठिकाणी स्फोट घडवा, बड्या व्यक्तींना ठार मारा, असा आदेश या दोघांनी दिला होता, असेही आरोपपत्रात नमूद आहे.

जंगलातील प्रशिक्षणही घेतले

जंगलात राहायचे आणि तिथे वेगळा प्रांत उभा करायचा, यासाठी जंगल प्रशिक्षण आवश्यक असल्याने, त्यांनी कर्नाटकातील शिवनासामुद्रा आणि गुंडेलपेट येथे जंगलासारखेच वातावरण तयार करून, आपल्या सर्व अतिरेक्यांना प्रशिक्षण दिले. त्यांना इसिसच्या विदेशातील म्होरक्यांकडून डार्क वेबच्या माध्यमातून यासाठी आवश्यक त्या सूचनाही मिळायच्या.

रत्नागिरीला अड्डा बनविण्याची होती योजना

सुरक्षा दलांच्या कारवाईत लपता यावे, यासाठी काही शहरांमध्ये आपले अड्डे स्थापन करण्याची इसिसची योजना होती. यात प्रामुख्याने महाराष्ट्रातील रत्नागिरी, कर्नाटकातील कोलार व कोडागू, गुजरातमधील जांबुसार, आंध्रातील चित्तूर आणि पश्चिम बंगालमधील वर्धमान व सिलिगुडी या शहरांची निवड करण्यात आली होती

हिंदू व राजकीय नेत्यांच्या हत्येचा कट

हिंदू नेते, राजकीय व्यक्ती, पोलिस व सरकारी अधिकारी आणि इतर बड्या व्यक्तींची सामूहिक हत्या करायची आणि जंगलातील आपल्या या प्रांतात लपायचे, असा इसिसचा कट होता, असेही आरोपपत्रात म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या