नाशिक रोड| प्रतिनिधी
येथील इंडिया सिक्युरिटी व करन्सी नोट प्रेस मधील मजदूर संघाच्या निवडणुकीत अखेर कामगार पॅनल ने घवघवीत यश प्राप्त केले असून या निवडणुकीत जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे , कार्याध्यक्ष पदी ज्ञानेश्वर जुंद्रे तसेच खजिनदार पदी अशोक पेखळे हे प्रचंड बहुमताने निवडून आले आहे. या निवडणुकीत विरोधी आपला पॅनलचा पूर्णपणे धुवा उडाला.
नाशिक शहर व जिल्ह्यातील तसेच नाशिक रोड परिसरातील औद्योगिक क्षेत्रातील कामगारांचे तसेच नागरिकांचे या निवडणुकीच्या निकालाकडे लक्ष लागले होते शनिवारी मजदूर संघाची निवडणूक संपन्न झाली या निवडणुकीत सुमारे 95 टक्के मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला होता. मजदूर संघाच्या एकूण 30 जागा असून त्यापैकी अध्यक्षपदासाठी जयंत भोसले यांचा एकमेव अर्ज आल्याने ते बिनविरोध निवडून आले तर इतर 29 जागेसाठी कामगार पॅनल व आपला पॅनल मध्ये लढत झाली.
शनिवारी मतदान झाल्यानंतर रविवारी सकाळी आठ वाजता सिक्युरिटी प्रेस येथील ट्रेनिंग सेंटर मध्ये मतमोजणीला प्रारंभ झाला या मतमोजणी सुरुवातीपासूनच पॅनलचे उमेदवार आघाडीवर होते जसजसा निकाल लागू लागला तसा कामगारांनी जल्लोष करून गुलाल उधळीत आनंद उत्सव सुरू केला या निवडणुकीत निवडून आलेले उमेदवार पुढील प्रमाणे.
उपाध्यक्ष म्हणून रामभाऊ जगताप राजेश टाके कर कार्तिक डांगे प्रवीण बनसोडे त्याचप्रमाणे जॉईंट सेक्रेटरी म्हणून संतोष कटाळे नंदू कदम राजू जगताप अविनाश देवरुखकर बबन सैद डॉक्टर चंद्रकांत हिंगमिरे त्याचप्रमाणे कार्यकारणी सदस्याच्या 16 जागेवर मनीष कोकाटे, कांचन खर्जुल, दत्ता गांगुर्डे, विनोद गांगुर्डे, संजय गुंजाळ, संपत घुगे, सतीश चंद्र मोरे, सचिन चिडे, शैलेश जाधव, शंतनू पोटिंदे, दशरथ बोराडे, समाधान भालेराव, राजेंद्र वारुंगसे, संदीप व्यवहारे, रोप शेख, बाळू सानप हे प्रचंड मताने विजयी झाले निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उत्तम गांगुर्डे यांनी काम बघितले.
प्रेस मजदूर संघाच्या निवडणुकी त गेल्या बारा वर्षापासून कामगार पॅनलची सत्ता आहे यावर्षी पुन्हा कामगार पॅनलने पूर्णपणे बहुमत मिळवून एक हाती सत्ता मिळविली. जनरल सेक्रेटरी पदावर जगदीश गोडसे हे तब्बल चौथ्यांदा विजयी झाले. त्या अगोदर ते कार्याध्यक्ष म्हणून निवडून आले होते. कामगार पॅनलच्या विजयाबद्दल बोलताना जगदीश गोडसे व ज्ञानेश्वर जुंद्रे म्हणाले की गेल्या बारा वर्षात कामगार पॅनल कामगारांच्या प्रत्येक प्रश्नांना प्राधान्य दिले कामगार हिताचे महत्वाचे प्रश्न मार्गी लावले त्यामुळेच कामगारांनी आमच्यावर विश्वास टाकला त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. असेही ते म्हणाले