Thursday, June 11, 2026
Homeदेश विदेशइस्त्रायलचा गाझा शहरावर पुन्हा एअर स्ट्राईक; पाच पत्रकारांचा मृत्यू

इस्त्रायलचा गाझा शहरावर पुन्हा एअर स्ट्राईक; पाच पत्रकारांचा मृत्यू

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
इस्रायलने गाझा शहरात केलेल्या हवाई हल्ल्यात अल-जझीरा अरेबिकचे प्रतिनिधी अनस अल शरीफ यांच्यासह चार इतर पत्रकार ठार झाल्याची घटना रविवारी रात्री उशीरा घडली. इस्रायली लष्कराने हा हवाई हल्ला केला असल्याची पुष्टी केली आहे. अल-शरीफ यांच्यावर हमासचा हस्तक असल्याचा आरोप होता. पण ते पत्रकार असल्याचे भासवत होते. ते रॉकेट हल्ल्यांसाठी जबाबदार असून ते दहशतवादी सेलचे नेतृत्व करत होते, असा आरोप इस्रायलने केला आहे.

अल-जझीराने दिलेल्या वृत्तानुसार, हॉस्पिटलच्या बाहेर असलेल्या तंबूला लक्ष्य करत झालेल्या हल्ल्यात एकूण सात जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती शिफा हॉस्पिटलच्या एका अधिकाऱ्याने दिली. अली जझीराने इस्रायलच्या या कृत्याचा निषेध करताना ही ठरवून केलेली हत्या असल्याचे म्हटले आहे. गाझामधून स्वतंत्रपणे चालणारे वार्तांकन दाबून टाकण्याचा हा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. ही घटना जवळपास दोन वर्षांपासून युद्ध सुरू झाल्यापासूनच्या सर्वात घातक घटनापैंकी एक आहे. ज्यात सुमारे २०० माध्यमांतील कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे, असे प्रेस फ्रीडम ग्रुप्सनी म्हटले आहे. गाझामध्ये जाण्यासाठी आंतरराष्ट्रीय मीडियावर अनेक निर्बंध असल्याचही म्हटले आहे.

- Advertisement -

इस्रायलच्या हल्ल्यात आपल्या पाच कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची अल जझीराने पुष्टी केलीय. यात मुख्य प्रतिनिधी अनस अल-शरीफ आहे. रिपोर्टर मोहम्मद, कॅमेरा ऑपरेटर इब्राहिम झाहर, मोहम्मद नौफल आणि मोअमेन अलिवा यांचा मृत्यू झाला आहे. अल-शिफा रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर प्रेससाठी लावलेल्या एका तंबूत ते राहत होते. इस्रायलने या तंबूला टार्गेट करुन हल्ला केला.

“अनस अल शरीफ हा हमास या दहशतवादी संघटनेच्या दहशतवादी सेलचा प्रमुख होता आणि इस्रायली नागरिक आणि आडीएफ सैन्याविरोधात रॉकेट हल्ले घडवू आणण्यात त्याचा सहभाग होता,” असे इस्रायली सैन्याने एका निवेदनात म्हटले आहे.

२८ वर्षीय अल-शरीफ यांना युद्धस्थितीचे वार्तांकन करणारे अरबी भाषेतील प्रसिद्ध पत्रकार म्हणून ओळखले जाते. त्यांनी त्यांच्या मृत्यूच्या काही तास आधीच, X वर जवळच झालेल्या इस्रायली हल्ल्यांचे फुटेज पोस्ट केले होते. त्यांच्या मृत्यूमुळे गाझामधील पत्रकारांच्या सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. गाझामध्ये इस्रायली लष्कराच्या सुरक्षेविना परदेशी पत्रकारांना प्रवेश बंदी आहे. यामुळे स्थानिक पत्रकार सर्वाधिक वृत्तांकन करतात.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Ahilyanagar : राहुरीसह अन्य कृषी विद्यापीठांतील पद भरतीचा मार्ग मोकळा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar राज्यातील कृषी विद्यापीठांच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी मिळाली आहे. तब्बल 23 वर्षांनंतर विद्यापीठांच्या अ आणि ब संवर्गातील एकूण 3,723 पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता...