Saturday, July 27, 2024
Homeदेश विदेशभारताचा दानशूरपणा! युध्दादरम्यान पॅलेस्टिनींना पाठवली मोठी मदत

भारताचा दानशूरपणा! युध्दादरम्यान पॅलेस्टिनींना पाठवली मोठी मदत

नवी दिल्ली | New Delhi

इस्त्रायल आणि हमास युद्धाच्या (Israel-Hamas War) पार्श्वभूमीवर भारताने पॅलेस्टिनींना मोठी मदत पाठवली आहे (India Send’s Humaneterian Aid to Palestine). इस्रायलसोबतच्या युद्धात दोन्ही बाजूंनी हजारो लोकांचा बळी गेला आहे. यावेळी हमास आणि इस्त्रायल युद्धात पॅलेस्टिनींना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. भारताने पॅलेस्टाईनच्या लोकांसाठी मदत पाठवली आहे.

- Advertisement -

युद्धाने होरपळलेल्या नागरिकांसाठी भारताने मानवीय मदत पाठवली आहे. यासंबंधीची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे. ते म्हणाले, भारत गाजातील नागरिकांसाठी मदत पाठवत आहे.

पुढे त्यांनी असे म्हंटले आहे, ”पॅलिस्टाईनच्या नागरिकांसाठी जवळपास ६.५ टन वैद्यकीय मदत आणि ३२ टन आपत्ती व्यवस्थापन संबंधीचे साहित्य घेऊन IAF C-17 विमान इस्रायलसाठी रवाना झाले आहे. इस्रायलच्या एल-अरिश विमानतळाच्या दिशेने या विमानाने उड्डाण केले आहे.”यामध्ये जीवन रक्षक औषधे, सर्जिकल वस्तू, तंबू, स्लिपिंग बॅग, ताडपत्री, स्वच्छता सेवा, पाणी शुद्ध करणारी औषधे यासह अनेक वस्तू पाठवण्यात आल्या आहेत.

इस्रायलने राफाह सीमेवरील मार्ग मोकळा केला आहे. सूत्र आणि इस्रायल रेड क्रिसेंटच्या एका अधिकाऱ्याने एएफपीला दिलेल्या माहितीनुसार, इस्रायलने गाजामध्ये मानवीय मदत पोहण्यासाठी सीमा खुली केली असून शनिवारपासून राफाह बॉर्डर खुली करण्यात आली आहे.

इतका अपयशी मंत्री राज्याने पाहिला…; खासदार संजय राऊत यांची देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका

दरम्यान, ७ ऑक्टोबरपासून हमासच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने हल्ले केले होते. ज्यात कमीतकमी १,४०० लोक मारले गेले. हमास संचालित आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, काउंटर स्ट्राइकमध्ये ४,३०० हून अधिक पॅलेस्टिनी, प्रामुख्याने स्थानिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या