नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
इस्रायलने हमासविरुद्ध (Israel Hamas War) सुरू असलेल्या लढ्यात आक्रमक पावित्रा घेतला आहे. गाझा पट्टीला वेढा घातल्याने तिसऱ्या दिवशीही वीज, इंधन आणि खाद्यपदार्थांचा पुरवठा बंद आहे तर गाझाच्या (Gaza Strip) सिमेवर इस्राईलने हमास विरोधात तीन लाख राखीव सैन्य उतरवले आहे. त्यामुळे पॅलेस्टाईनवर दबाव वाढला असून हमासने इस्राईलविरोधात युध्द पुकारल्याच्या काही तासातच माघार (Hamas Ready To Discuss On CeaseFire) घेण्याचे ठरवले आहे. यासंदर्भात हमासने इस्राईलसमोर युध्दबंदीचा प्रस्ताव ही ठेवला असल्याचे समजत आहे.
इस्रायल-हमास युद्धानंतर जगभरात सतत निदर्शने होत आहेत. कोणी इस्रायलला पाठिंबा देत आहे. तर कोणी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ उभा आहे. त्याचप्रमाणे ब्रिटनमध्येही युद्धानंतर दोन गट तयार झाले असून त्यांच्यात हाणामारी झाली. हमासचा जेष्ठ नेता असलेला मुसा अबू मारझूक याने म्हंटले आहे की, आम्ही आमचे लक्ष गाठले असून संभाव्य युद्धविरामावर आम्ही इस्रायलशी चर्चा करण्यास तयार आहोत.
“केसरकर म्हणजे मोती तलावातील डोमकावळा, शिंदे टोळीने…”; संजय राऊतांची खोचक टीका
नेतन्याहू काय म्हणाले?
या युध्दाने आता महत्वाचे वळण घेतले असून इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी ही हमास विरुध्द आक्रमक पवित्रा घेतला आहे. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी एक्सवरुन विधान केले आहे की, इस्रायल या दहशतवाद्यांशी दोन हात करत आहे. हे युद्ध आम्हाला नको होते. पण अत्यंत क्रूर आणि हिंसक पद्धतीने हे युद्ध आमच्यावर लादले गेले आहे. हे युद्ध इस्रायलने सुरू केले नसले तरी याचा शेवट आम्हीच करणार आहोत. एकेकाळी ज्यू लोक भूमीहीन होते. काही काळासाठी ज्यू लोक निराधार होते. परंतु यापुढे असे चालणार नाही.”
Shivsena Dasara Melava : यंदाही शिवाजी पार्कवर ठाकरेंचाच आवाज घुमणार; शिंदेंच्या शिवसेनेची माघार, केसरकरांनी सांगितलं कारण
दरम्यान, या युद्धात दोन्ही बाजूच्या १६०० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. गाजाच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार गाजा पट्टीत आतापर्यंत ७०४ लोक मारले गेले आहेत. यामध्ये १४३ लहान मुलं आणि १०५ महिलांचा समावेश आहे. तसेच गाजा पट्टीत ४,००० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. तर हमासच्या हल्ल्यात ९०० हून अधिक इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तसेच २,६०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत.