Saturday, July 27, 2024
Homeदेश विदेशचांद्रयान-३ नंतर इस्रोची पुढची मोहिम; इस्रो प्रमुख एस सोमनाथ यांनी दिली माहिती

चांद्रयान-३ नंतर इस्रोची पुढची मोहिम; इस्रो प्रमुख एस सोमनाथ यांनी दिली माहिती

मुंबई | Mumbai

चांद्रयान-३ (Chandrayaan-3) च्या यशानंतर जगभरात इस्रोचे (ISRO) कौतुक होत आहे. चंद्रावर स्वारी केल्यानंतर इस्रो आता सुर्याजवळ जाण्याची तयारी करत आहे. दुसरीकडे इस्रो प्रमुख एस सोमनाथ (S. Somnath) यांनी महत्वाचे विधान केले आहे. तो दिवस दूर नाही जेव्हा एक भारतीय अंतराळवीर चंद्रावर पाऊल ठेवेल, असे इस्रो प्रमुख म्हणाले. आपला देश खूप शक्तिशाली आहे. देशातील तरुणांनी अभ्यास करून देशासाठी काम करण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.

- Advertisement -

इस्रो पुन्हा एकदा इतिहास रचण्याच्या तयारीत आहे. आता आदित्य एल-१ मिशन सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात लाँच केले जाईल. त्याची तयारी पूर्ण झाली आहे. तारीख लवकरच जाहीर केली दाणार असल्याची माहिती इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी शनिवारी दिली. ते प्रक्षेपित करण्याचे इस्रोचे पुढील लक्ष्य असल्याचे त्यांनी सांगितले.

‘मन की बात’ मधून पंतप्रधानांचे देशवासियांना संबोधन; म्हणाले चांद्रयान भारताचे…

भारताकडे चंद्र, मंगळ आणि शुक्र ग्रहावर प्रवास करण्याची पुरेशी क्षमता आहे. परंतु आपल्याला आपला आत्मविश्वास वाढवण्याची गरज आहे. अंतराळ क्षेत्राच्या विस्ताराद्वारे देशाच्या सर्वांगीण प्रगतीचा एक भाग बनण्याचे इस्रोचे उद्दिष्ट आहे,” असे ही एस सोमनाथ म्हणाले.

India Alliance : ‘इंडिया’ आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार कोण? मुंबईतील बैठकीआधी कॉंग्रेसच्या ‘या’ नेत्याने दिली महत्त्वाची माहिती

आदित्य एल १ होणार लाँच

यावेळी त्यांना आदित्य-एल १ बद्दल त्यांनी सांगितले, “हा उपग्रह तयार करण्यात आला आहे आणि श्रीहरिकोटा येथे पोहोचला आहे. आदित्य एल १ सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात लाँच होण्याची शक्यता आहे आणि दोन दिवसात तारीख जाहीर केली जाईल. प्रक्षेपणानंतर, पृथ्वीपासून लॅग्रेंज पॉइंट १ (L1) पर्यंत पोहोचण्यासाठी १२५ दिवस लागतील. तोपर्यंत आपल्याला वाट पहावी लागेल,” असे ते म्हणाले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

- Advertisment -

ताज्या बातम्या