Saturday, June 15, 2024
Homeमुख्य बातम्याचंद्रानंतर आता सूर्य मिशन! आदित्य-L1 या तारखेला झेपावणार; इस्रोने दिली माहिती

चंद्रानंतर आता सूर्य मिशन! आदित्य-L1 या तारखेला झेपावणार; इस्रोने दिली माहिती

मुंबई | Mumbai

- Advertisement -

चांद्रयान-३ मोहिम यशस्वी झाल्यानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) आणखी एक मोहीम सुरू केली आहे. आता इस्रो सूर्याकडे जाण्याच्या तयारीत आहे. इस्रो २ सप्टेंबर रोजी सूर्य मोहीम लॉन्चिंग करणार आहे.

याबाबत माहिती देताना इस्रोने सांगितले की, यासाठी सकाळी ११.५० वाजताची वेळ निश्चित करण्यात आली आहे. श्रीहरिकोटा येथून याचे प्रक्षेपण केले जाणार आहे. खरं तर सूर्याचा अभ्यास करणारी ही पहिली भारतीय मोहीम असणार आहे.

आदित्या एल १ या अवकाश यानाद्वारे सुर्याभोवतीच्या तेजोमंडळ आणि प्रभामंडलाचे निरीक्षण करण्यात येणार आहे. यामुळे शास्रज्ञांना सुर्यामुळे ग्रह-ताऱ्यांवर होणार्या परिणामांचा अभ्यास करण्यास मदत होणार आहे. या मोहिमेबद्दल अधिक माहिती देताना इस्रोने सांगितले की, या यानावरील ७ पेलोडस्ड द्वारे सुर्याभोवतीच्या वातावरणाचे निरीक्षण करता येणार आहे. यात ४ पेलोडस् थेट सुर्याचे तर ३ पेलोडस् सुर्याच्या किरणांचे निरीक्षण करणार आहे.

बेंगळुरू येथील इस्रोच्या मुख्यालयातून याचे प्रक्षेपण केले जाईल. ISRO २ सप्टेंबर रोजी सकाळी ११.५० वाजता श्रीहरिकोटा येथून सूर्याचा अभ्यास करणारी पहिली अंतराळ-आधारित भारतीय वेधशाळा आदित्य-L1 लाँच करेल.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या