Wednesday, December 4, 2024
Homeदेश विदेशEOS-3 Satellite Launch : इस्रोचे मिशन EOS-3 का झाले फेल?

EOS-3 Satellite Launch : इस्रोचे मिशन EOS-3 का झाले फेल?

दिल्ली | Delhi

भारतीय अंतराळ संशोधन संस्था- इस्रो (ISRO) आज सकाळी एक नवा इतिहास रचण्यापासून मुकलं आहे. इस्रोच्या (GISAT-1) जीएसएलव्ही- एफ १० या उपग्रहाचे आज सकाळी ५:४५ च्या सुमारास प्रक्षेपण करण्यात आले. मात्र इस्रोची उपग्रह प्रक्षेपण मोहीम अयशस्वी ठरली आहे.

- Advertisement -

इस्रोने ISRO आज भारताचे ‘आकाशातील नेत्र’ म्हटल्या जाणाऱ्या GISAT-1 या पृथ्वी निरीक्षण उपग्रहाचे प्रक्षेपण केले. पहिल्या दोन स्टेजमध्ये GSLV रॉकेट योग्य मार्गावर होते. पण तिसऱ्या स्टेजमध्ये क्रायोजेनिक इंजनमध्ये बिघाड झाला आणि GSLV-F10 EOS-03 मोहिम फसली. पहिल्या दोन स्टेजमध्ये रॉकेटची कामगिरी सामान्य होती. पण तिसरी क्रायोजेनिक अप्पर स्टेज प्रज्वलित होऊ शकली नाही.

अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यात रॉकेटमधील क्रायोजेनिक इंजिनामध्ये गडबड झाली. ज्यामुळे पृथ्वी निरीक्षण उपग्रह (EOS-3)ची GSLV-F10 ही मोहीम अयशस्वी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रॉकेटने उड्डाण देखील केलं. मात्र, काही मिनिटांनीच या रॉकेटचा कंट्रोल रुमशी संपर्क तुटला. मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्यात गडबड झाल्याचे लक्षात आल्यावर मिशन कंट्रोलमधील सर्व शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, अभियंते यांचे चेहरे चिंतातुर झाले. त्यानंतर दहा मिनिटात या मोहिमेचा आढावा घेत इस्रोचे अध्यक्ष डॉ के सिवन यांनी मोहीम पूर्ण झाली नसल्याचे स्पष्ट केले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या