Wednesday, May 22, 2024
Homeमुख्य बातम्याचंद्रानंतर आता ‘इस्रो’चा 'सूर्य नमस्कार'! ‘आदित्य एल१’चं आज प्रक्षेपण; नेमकं काय...

चंद्रानंतर आता ‘इस्रो’चा ‘सूर्य नमस्कार’! ‘आदित्य एल१’चं आज प्रक्षेपण; नेमकं काय साध्य होणार? जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली | New Delhi

चांद्रयान-३ च्या (Chandrayaan-3) यशस्वी मोहिमेनंतर भारतीय अंतराळ संस्था ( ISRO) आता सूर्याच्या (Sun) अभ्यासासाठी आपलं पहिलं सौर मिशन आदित्य एल१ लाँच करणार आहे. ‘आदित्य एल१’ अंतरयान श्रीहरिकोटा (Sriharikota) येथून आज (दि.२ सप्टेंबर ) ११.५० वाजता प्रक्षेपित होणार आहे. लाँचिंगच्या १२७ दिवसांनी यान एल-१ अचूक कक्षेपर्यंत पोहचेल. यानंतर सूर्याच्या अभ्यासाद्वारे आकाशगंगेतील तसेच इतर विविध आकाशगंगांमधील ताऱ्यांबद्दल बरीच माहिती मिळवता येईल, असे ‘इस्रो’ने सांगितले आहे…

- Advertisement -

Maratha Andolan : शरद पवार आणि उद्धव ठाकरे घेणार जालन्यातील मराठा आंदोलकांची भेट

‘पीएसएलव्ही सी५७’ हा शक्तिशाली वाहक ‘आदित्य एल१’ यानाला घेऊन अंतराळात झेपावणार आहे. पृथ्वीपासून सुमारे १५ लाख किलोमीटरवरील ‘एल१’ (सूर्य-पृथ्वी लॅग्रॅन्जिअन पॉइंट) येथील सौर वारे आणि सूर्याचे प्रभामंडल यांचे दूरस्थ निरीक्षण करण्यासाठी ‘आदित्य एल१’ ची (Aditya L1) रचना करण्यात आली आहे. आदित्य एल१ १५ लाख किलोमीटर प्रवास केल्यानंतर लॅग्रेंज पॉइंट -१ येथे पोहचेल. येथून सुर्य स्पष्ट सहज पाहाता येईल. येथे पोहचल्यानंतर मिशन जवळपासच्या परिस्थितीची माहिती घेईल आणि वेगवेगळ्या डेटाचा अभ्यास करेल. आदित्य एल १ सौर करोनावरील डेटा तसेच व्हिज्युएल इमिशन लाइनचा अभ्यास करेल. या अभ्यासासाठी अनेक प्रगत उपकरणे आदित्य एल १ सोबत पाठवण्यात येतील.

Video : नाशकात मराठा समाजाकडून राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी

आदित्य एल१ नेमकं कसं काम करेल याबाबत बेंगळुरू येथील इंडियन इंस्टीट्यूट ऑफ एस्ट्रॉफिजिस्क (आयआयए) चे प्रोफेसर जगदेव सिंह (Jagdev Singh) यांनी माहिती देतांना सांगितले की, आदित्य एल१ सुर्याचा अभ्यास करण्यासाठी भारताचे पहिले समर्पित वैज्ञानिक मिशन आहे. सुरूवातीची योजना याला ८०० किमी खाली पृथ्वीच्या कक्षेत लाँच करण्याची होती, मात्र २०१२ मध्ये इस्त्रोसोबतच्या चर्चेनंतर हा न मीशन एल१ (लॅग्रेंज पॉइंट १) च्या भोवताली एका हॅलो कक्षेत टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. ही कक्षा पृथ्वीपासून सुर्याच्या दिशेने १५ लाख किमी अंतरावर आहे.

Asia Cup 2023 : भारत-पाकिस्तान यांच्यात आज महामुकाबला; ‘अशी’ असेल टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

तसेच या मिशनच्या माध्यमातून आपण सुर्याच्या विविध अंगाचा आता अभ्यास करता येणे शक्य होणार आहे. यामध्ये तापमान प्लझ्माचा देखील समावेश आहे. प्लाझ्मा तापमान इतके अधिक का असते, अशी कोणती प्रक्रिया आहे ज्यामुळे थंड प्लाझ्मा गरम होतो इत्यादी निरीक्षण करता येणार आहे. यामुळे आपल्याला पृथ्वीपर्यंत पोहचणाऱ्या कोरोनल मास इजेक्शन (सीएमई) ला लागणारा वेळ आणि गतीचा योग्य अंदाज करता येण्यास मदत होईल. जरी आदित्य एल१ ची कल्पना २०१२ मध्ये केली असली तरी तरी याला आकार देण्याचे काम खूप आधीपासून सुरू झाले होते, असेही त्यांनी सांगितले.

भारताची ‘हनुमान उडी’! Aditya L1 सूर्याच्या दिशेने झेपावलं, पाहा VIDEO

मिशनचा कालावधी किती असेल?

मिशनचा कालावधी आणि सूर्याचा अभ्यास याबद्दल सिंह यांनी सांगितले की यासाठी १२७ दिवसांचा वेळ लागणार आहे. हे अंतराळ यान इच्छित ठिकाणी पोहचण्यास १२७ दिवस त्यानंतर काही अभ्यास पूर्ण केले जातील. पुढील वर्षी फेब्रुवारी, मार्चपर्यंत डेटा मिळणे सुरू होईल. साधारणपणे एखादा उपगृह पाच वर्ष राहावा यासाठी योजना बनवलेली असते. जी किमान मिशन लाईफ आहे मात्र आपल्याला १० ते १५ वर्षांपर्यंत डेटा मिळणे सुरू ठेवले जाऊ शकते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Maratha Andolan : लाठीचार्ज केला, गोळ्या झाडल्या.. हे दहशतवादी आहेत का?; छत्रपती संभाजीराजेंचा संताप

- Advertisment -

ताज्या बातम्या