Saturday, July 27, 2024
Homeनगरआयटी कंपनीत काम करणार्‍या शिर्डीतील 'त्या' तरुणाचा पुण्यात खून

आयटी कंपनीत काम करणार्‍या शिर्डीतील ‘त्या’ तरुणाचा पुण्यात खून

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

पुणे (Pune) येथील आयटी कंपनीत (IT Company) काम करणार्‍या शिर्डीच्या (Shirdi) तरुणाचा पुणे नाशिक मार्गावरील (Pune Nashik Highway) खेड घाटात खून झाल्याने खळबळ उडाली आहे. सौरभ नंदलाल पाटील (वय-23) असे खून (Murder) झालेल्या तरुणाचे नाव आहे.

- Advertisement -

सौरभाचे शिक्षण शिर्डीतील (Shirdi) आदर्श शाळेत झाले असुन त्याचे वडील देखील आदर्श माध्यमिक विद्यालयात शिक्षक (Teacher) आहेत. एम़ टेक़च्या दुसर्‍या वर्षात शिकणारा सौरभ पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कमध्ये (Hinjewadi IT Park) अभियंता (Engineer) म्हणून कामाला होता.

शासनाच्या दुधदर धोरणाबाबत दुध उत्पादकांत नाराजी

28 जुलै पासुन तो बेपत्ता होता. सौरभचे नातेवाईक संदीप सोनवणे यांनी हिंजवडी पोलीसात (Hinjewadi Police) हरवल्याची तक्रार दिली होती. त्याची दुचाकी (Bike) खेड (Khed) तालुक्यातील होलेवाडी परिसरात आढळली होती. तसेच गाडीची चावी जवळ असलेल्या विहिरीच्या (Well) कठड्यावर आढळली होती. त्यामुळे परिसरातील विहीरी, पाणवठे, नदी किनारे आदी ठिकाणी त्याचा शोध घेण्यात आला होता. मात्र त्याचा शोध कुठे लागत नव्हता. अखेर रविवारी त्याचा मृतदेह खेड घाटात सांडभोरवाडी येथील वन विभागाच्या (Forest Department) हद्दीत डोंगर उतारावर झाडाझुडपात कुजलेल्या अवस्थेत सापडला. खेड घाटात मृतदेह आढळल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक बिरुदेव काबुगडे यांनी सरकार पक्षातर्फे फिर्याद दिली आहे. खेड पोलिसांनी याबाबत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल (Filed a Case) केला असुन पोलीस पुढील तपास करत आहेत.

एमआयडीसीचे आरक्षण टाकून, जागा विकणे म्हणजे विकास नव्हे

मनमिळावू स्वभावाचा सौरभ दिड महिन्यापुर्वीच नोकरीस लागला होता. तो नोकरी करून एम़ टेकच्या द्वितीय वर्षाचे शिक्षण घेत होता. त्याच्या पश्चात आई, वडील व लहान भाऊ असा परिवार आहे. सौरभच्या मृत्यूने शिर्डीत (Shirdi) हळहळ व्यक्त होत आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते यांनी याबाबत उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांना या घटनेची माहिती दिली. त्यानुसार पवार यांच्या कार्यालयाने पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांना तातडीने व सखोल चौकशी करून सौरभच्या मारेकर्‍यांना जेरबंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

माजी खा. वाकचौरे लवकरच ठाकरे शिवसेनेत

- Advertisment -

ताज्या बातम्या