Friday, December 13, 2024
Homeनाशिकमहायुतीला महाराष्ट्रातून १० जागा जिंकणेही अवघड - खा. संजय राऊत

महायुतीला महाराष्ट्रातून १० जागा जिंकणेही अवघड – खा. संजय राऊत

नाशिक । प्रतिनिधी Nashik

उध्दव ठाकरे हे नकली संतान म्हणून मोदींनी संबोधले होते. त्यांनी शिवसेना प्रमुखांचा व माँसाहेबांचा अपमान केला आहे. महाराष्ट्र हे खपवून घेणार नाही. नरेंद्र मोदी विरुद्ध आज महाराष्ट्र उभा आहे. नाशिकची जागा तर जिंकलेलीच आहे. मात्र मोदींना महाराष्ट्रातून 48 पैकी 10 जागा जिंकणे अवघड झाले आहे. त्यामुळेच मोदींना महाराष्ट्राची भीती वाटू लागली असल्याचे प्रतिपादन खा. संजय राऊत यांनी सातपूर येथे केले.

- Advertisement -

अशोकनगर सातपूर येथे आयोजित जाहीर सभेत खा. राऊत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे, आ. नरेंद्र दराडे, माजी आमदार नितीन भोसले, माजी आमदार योगेश घोलप, गजूनाना शेलार, डॉ. हेमलता पाटील, डॉ. डी. एल. कराड, सीताराम ठोंबरे, दत्ता गायकवाड, सुधाकर बडगुजर, विलास शिंदे, डीजी सूर्यवंशी आदींसह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी खा. राऊत यांनी या देशाची स्वातंत्र्याची लढाई असल्याचे सांगून देश लुटणार्‍या लोकांना जनतेने धडा शिकवण्याचा निर्धार केला आहे. देशाचे पोट भरण्याचे काम महाराष्ट्राने केलेले आहे. या महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला नेऊन महाराष्ट्राला दुबळा करण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्याला नामर्द सत्ताधारी हे सर्व उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत. लढणार्‍या महाराष्ट्राला लंगडे, पांगळे करून टाकले आहे. त्यामुळे आता हे सहन केले जाणार नाही.निवडणूक लोकांनी हातात घेतली आहे. वक्त बदल दो । ताज बदल दो। गद्दारोका राज बदल दो ॥ या शब्दातून राजाभाऊ वाजे यांना विजयी करण्याचे आवाहन केले. मोदींनी राज्यात 27 सभा घेतल्या. पुढे 9 सभा घ्याव्या लागत आहेत.

सुरुवातीला महानगरप्रमुख विलास शिंदे यांनी प्रास्ताविकेत सभेचे आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली. देशाच्या विकासासाठी दहा वर्षांत कोणतेच धोरण, कायदे केलेले नाहीत. देशाच्या विकासाचे रूपरेषा देखील ठरवलेली नाही. शेतकर्‍यांच्या एक लाखापेक्षा जास्त आत्महत्या झाल्या. त्यावर काहीच न बोलणार्‍या सरकारने देशातल्या शेतकरी कामगारांच्या हक्काच्या विरोधी धोरण केल्याने लोक देशोधडीला लागले आहेत. त्यामुळे या सरकारला खाली खेचण्याशिवाय पर्याय नसल्याचे आवाहन डॉ. कराड यांनी केले.

…मगर अपने अवकात मत भुलो
सुधाकर बडगुजर यांनी विजयी करंजकर यांच्या खरपूस समाचार घेतला. गद्दार आणि पक्षाचे निष्ठेच्या गप्पा करू नये. करंजकर यांनी पक्ष नव्हे तर आईच बदलून टाकली आहे. त्यावेळी त्यांची निष्ठा कुठे गेली होती. माझ्या नाचण्याच्या व्हिडीओची संपूर्ण चौकशी झाली आहे. त्यांच्या पप्पीच्या व्हिडीओची पण चौकशी का केली नाही. असा सवाल उपस्थित करतानाच ‘बडे झुलो मे झूलो, मगर अपने अवकात मत भुलो’ अशा शब्दात त्यांनी हेमंत गोडसे व करंजकरांचा समाचार घेतला. यावेळी बॉश कंपनीच्या कामगारांनी स्ववर्गणीतून पंचावन्न हजार रुपयांचा निधी निवडणूक प्रचारासाठी राजाभाऊ वाजे यांना सुपूर्द केला. छात्रभरातील संघटनेसह अनेक युवकांनी शिवसेनेत प्रवेश केला.

मोठ्या रुग्णालयासाठी प्रयत्नशील: वाजे
प्रामाणिकपणा व निष्ठा या दोन तत्वांवर मला उमेदवारी मिळाली असून मला आपण आशीर्वाद दिला तर मी या गंगेच्या तीरावर बसून लोकांची कामे करून असे आश्वासन समाविचाराचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी दिले. अनेक वेळा सुंदर होऊन कारभार चालेल का, असा प्रश्न विचारला जातो, यासाठी त्यांनी उत्सव हे उत्तर दिले. मागील 45 दिवसांपासून आणखी दहा दिवस राहणार आहे. सार्वजनिक आरोग्याच्या प्रश्नावर खर्च करण्याबाबत कोणीच बोलत नाही. सातपूर, अंबड या कामगार कष्टकरी वसाहतींमध्ये मोठ्या रुग्णालय होणे अपेक्षित आहे. त्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई: खा. राऊत
देशाच्या स्वातंत्र्यासाठी मुस्लिम बांधवांनी बलिदान दिले, आता ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई आहे. मुस्लिमांची साथ आम्हाला असल्याचे प्रतिपादन खा. संजय राऊत यांनी जुन्या नाशिकमधील सभेत केले. यावेळी व्यासपिठावर माजी आमदार वसंत गीते, माजी महापौर विनायक पांडे, यतीन वाघ, काँग्रेसचे ज्ञानेश्वर गायकवाड, माजी नगरसेवक मुशीर सय्यद, संजय चव्हाण, सुचेता बच्छाव, सुरेश मारू, सचिन बांडे, जयंत दिंडे आदींसह मान्यवर होते. अचानक आलेल्या पावसामुळे सभा थोडक्यात आटोपती घेण्यात आली. यावेळी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या