Sunday, April 27, 2025
Homeक्रीडाItalian Open 2020 : नोव्हाक जोकोव्हिचने पटकावले विजेतेपद

Italian Open 2020 : नोव्हाक जोकोव्हिचने पटकावले विजेतेपद

दिल्ली | Delhi

सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचने(Novak Djokovic) कारकीर्दीत पाचव्यांदा इटालियन खुली टेनिस स्पर्धा(Italian Open 2020) जिंकण्याचा विक्रम केला आहे. उपांत्यपूर्व फेरीत स्पेनचा अव्वल टेनिसपटू राफेल नदालचा पराभव करत जोकोव्हिचने अंतिम फेरीत प्रवेश केला होता. त्यानंतर जोकोव्हिचने अंतिम फेरीत अर्जेटिनाच्या दिएगो श्वार्ट्झमनला(Diego Schwartzman) ७-५, ६-३ असे पराभूत करत विजेतेपद पटकावले.

- Advertisement -

नुकत्याच झालेल्या अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत जोकोव्हिचला रागाच्या भरात अनवधानाने पंचाच्या घशावर चेंडू आदळवल्यामुळे स्पर्धेबाहेर पडावे लागले होते. त्यात भर म्हणजे उपांत्यपूर्व सामन्यात रागाच्या भरात रॅकेट जमिनीवर आदळवल्यामुळे जोकोव्हिचला पंचांकडून ताकीद देण्यात आली.

अंतिम फेरीतही पहिल्या सेटमध्ये जोकोव्हिच ०-३ पिछाडीवर होता. या पिछाडीनंतरही जोकोव्हिचने पहिला सेट जिंकला. दुसरा सेटही सहज जिंकत जोकोव्हिचने पाऊस सुरू होण्याच्या आतमध्ये विजेतेपदावर नाव कोरले. त्यातच श्वार्ट्झमन ही एटीपी १००० प्रकारातील पहिलीच अंतिम लढत खेळत होता. त्याने उपांत्यपूर्व फेरीत स्पेनचा अव्वल राफेल नदालला पराभवाचा धक्का दिला होता.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

वकिलांनी कायदेशीरदृष्ट्या अद्ययावत रहावे – न्या. जैन

0
नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad गतिमान न्यायदान करताना वकिलांनी चौकस राहून वेळोवेळी कायद्यात होणार्‍या बदलांचा सखोल अभ्यास करावा व अद्ययावत राहावे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे...