Thursday, September 12, 2024
Homeजळगावभुसावळ रेल्वे विभागाच्या डीआरएमपदी इती पांडे

भुसावळ रेल्वे विभागाच्या डीआरएमपदी इती पांडे

भुसावळ । प्रतिनिधी bhusawal

भुसावळ विभागीय रेल्वे मंडळाच्या (डीआरएम) (drm) पदी पांडे यांची नियुक्ती करण्यात आली असून सौ.पांडे या मंगळवार दि.18 रोजी आपल्या पदाचा पदभार स्वीकारणार आहेत. पांडे या सध्या मुंबई स्थित रेल्वेच्या मुख्य वाणिज्य व्यवस्थापक व रेल्वे वाहतूक अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

- Advertisement -

सौ.पांडे या दक्षिण आफ्रिकेत (South Africa) कॉम्रेड मॅरेथॉन (Marathon) पूर्ण करणार्‍या पहिल्या महिला अधिकारी म्हणून त्यांचा सन्मानीत करण्यात आले आहे. त्यांनी ही मॅरेथॉन 11 तास 47 मिनिटे आणि 46 सेकंदात पूर्ण केली होती. अलाहाबाद (Allahabad) विद्यापीठातून मानसशास्त्राची पदवी त्यांनी घेतलेली आहे. त्यांचे वडील उत्तर प्रदेशात आरोग्य महासंचालक तर आई गृहिणी आहे. पाच बहिणींमध्ये इति या सर्वात लहान आहेत. त्यांचे पती वीरेंद्र ओझा हे मुंबईत (mumbai) आयकर विभागात (Income Tax Department) मुख्य आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. मुलगा तथागत हा कोलकत्ता येथे आयआयएम करीत आहे. तर कन्या अरुंधती ही कायद्याचे शिक्षण घेत आहे. भुसावळ विभागाच्या आजवरच्या इतिहासात या वरिष्ठ पदावर प्रथमच एक महिला अधिकारी येत असल्याने सर्वांना त्याचा आनंद आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या