Friday, October 30, 2026
Homeब्रेकिंग न्यूजIt’s done bro, everything is exposed!! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल

It’s done bro, everything is exposed!! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल

मुंबई | Mumbai
दिल्लीसह देशात सध्या निवडणूक आयोगाविरोधातील इंडिया आघाडीच्या आंदोलनाची चांगलीच चर्चा रंगली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात विरोधकांनी देशभरात अनेक आंदोलने सुरु ठेवली आहेत. नीट पेपरफुटीपासून सीजेपीच्या व्यासपीठावर दिसणारे नेहा बोरा, ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी केलेले विधान आता भाजपासाठी आयती संधी देणारे ठरले आहे. होय, आम्हाला सत्ता परिवर्तन हवंय असं प्रशांत भूषण यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं होते. हा व्हिडिओ पोस्ट करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंडिया आघाडी आणि सीजेपीच्या आंदोलनावर भाष्य केले आहे.

It’s done bro, everything is exposed!!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंडिया आघाडीच्या आंदोलनाच्या मुख्य हेतूवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, “It’s done bro, everything is exposed!! Afterall, it was all about Regime Change… (आता बस झालं भावा, सगळं पितळ उघडं पडलं. हे सर्व काही फक्त सत्तांतरांसाठी) अखेर मनात लपलेली गोष्ट ओठांवर आलीच.” असे म्हणत विरोधकांना टोला लगावला आहे. “हा संपूर्ण खेळ केवळ सत्तेसाठी सुरू आहे. मग त्यासाठी विद्यार्थ्यांच्या किंवा शेतकऱ्यांच्या भावना भडकवणे असो, जाती-धर्माच्या आणि भाषेच्या नावाखाली समाजात द्वेष पसरवणे असो, किंवा देशातील महत्त्वाच्या घटनात्मक संस्थांची प्रतिमा मलीन करणे असो. या आंदोलनाच्या आडून केवळ देशात अराजकता माजवण्याचा विरोधकांचा मूळ उद्देश आता उघड झाला आहे.” असे म्हणत त्यांनी विरोधकांवर गंभीर आरोप केले आहेत.

It’s done bro, everything is exposed !! Afterall, it was all about ‘Regime Change’..

आखिर मन में छुपी बात होठों पर आ ही गई!

सारा खेल सत्ता की कुर्सी पाने का है.. फिर उसके लिए विद्यार्थियों, किसानों को उकसाना ही क्यों ना पडे, जाति और भाषा के नाम पर द्वेष फैलाना पडे, या देश की प्रतिष्ठित संस्थाओं की प्रतिमा मलीन करनी पडे। आंदोलन की आड में अराजकता फैलाना ही ‘इनका’ उद्देश है।

#Maharashtra— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 16, 2026

- Advertisement -

बांगलादेशच्या धर्तीवर यांना सत्तांतर घडवायचं आहे
तर देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही काँग्रेसवर हाच आरोप केला. ज्याप्रकारे देशातील युवकांना भडकावलं जात आहे. त्यातून विरोधकांचा एकमेव अजेंडा आहे. त्यांना लोकशाहीतील घटनात्मक संस्थांना कमकुवत करून देशात आग भडकावयची आहे. देशातील युवकांना राजकारणासाठी वापर केला जात असून बांगलादेशच्या धर्तीवर यांना सत्तांतर घडवायचं आहे. नेहा बोरा हिने एका पत्रकार परिषदेत उघडपणे बांगलादेशचा आदर्श असल्याचं विधान केले. त्यातून विरोधकांचा अजेंडा स्पष्ट दिसून येतो असा आरोप राजनाथ सिंह यांनी केला होता.

ताज्या बातम्या

एकनाथ

महायुतीतील वादावर शिंदेंचा ‘ब्रेक’; एकनाथ शिंदेंचे नेत्यांना आदेश, म्हणाले…

0
मुंबई | Mumbaiविधान परिषद निवडणुकीतील निकालानंतर महायुतीत सुरू झालेल्या अंतर्गत धुसफुशीला आळा घालण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता थेट हस्तक्षेप केला आहे. भाजप आणि...