Friday, May 24, 2024
Homeजळगावगद्दारांना जागा दाखविण्याची आली वेळ!

गद्दारांना जागा दाखविण्याची आली वेळ!

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

स्व. बाळासाहेब ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी (Traitors) करणारे या 40 आमदारांना (MLAs) आता त्यांची जागा दाखविण्याची वेळ आली आहे. हेवेदावे विसरून एकत्र या आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांना पुन्हा मुख्यमंत्री पदावर बसविण्यासाठी जोमाने तयारीला लागा, असे आवाहन शुक्रवारी जळगावात झालेल्या शिवगर्जना अभियान (Shivgarjana Abhiyaan meeting) मेळाव्याप्रसंगी जळगाव जिल्हा सहसंपर्कप्रमुख डॉ.संजय सावंत यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना केले.

- Advertisement -

पोटच्या मुलाचा केला खून, आईसह भाच्याला झाली जन्मठेपजिल्हाधिकारी अन् ठाकरे गटाच्या पदाधिकार्‍यांमध्ये झाला शाब्दीक वाद

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची आज जळगावात लेवा भवन येथे शिवगर्जना अभियान मेळावा दुपारी तीन वाजता घेण्यात आला. मेळाव्यास प्रमुख उपस्थिती म्हणून सह संपर्क प्रमुख संजय सावंत उपस्थित होते. तसेच व्यासपिठावर सह संपर्क गुलाबराव वाघ, जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, जिल्हा प्रमुख डॉ. हर्षल माने, दिपक राजपूत, महानगरप्रमुख शरद तायडे, महापौर जयश्री महाजन, जिल्हा संघटक गजानन मालपुरे आदी पदाधिकारी व्यासपिठावर उपस्थित होते.

मेळाव्यात पुढे बोलतांना, संजय सावंत म्हणाले, की एकनाथ शिंदेनी आनंद दिघे यांचा नावाखाली मोठे होण्यासाठी त्यांचा प्लॅटफॉम तयार केला. पण आनंद दिघे बाळासाहेबांचे एकनिष्ठ होते पण त्यांच्या नावाखाली शिंदेसह अन्य आमदारांनी बाळासाहेबांची शिवसेनेशी गद्दारी केली. आता तर पक्ष देखील त्यांनी चोरला असून अशा चोरांना त्यांची जागा दाखवायची आहे.

लेवा गुजर समाजाची विवाहासाठीची ही आचारसंहिता वाचली का ?…अन तरुणीसह दोघांवर दाखल झाला गुन्हा

आगामी काळात येणार्‍या विधानपरिषदेच्या निवडणूकीत महाविकास आघाडी एकत्रपणे निवडणूक लढविणार आहे. त्यामुळे आघाडीतील कोणत्या पक्षाचा उमेदवार असला तरी आपल्याला एकनिष्ठता काय असते हे दाखवून द्यायचे आहे.

नुकताच कसबा निवडणूकीत या शिंदे आणि मिंदे सरकारला दाखवून दिले आहे. त्यामुळे आपले संघटन मजबूत करू असे मार्गदर्शन सावंत यांनी केले. तसेच यावेळी प्रमुख पदाधिकारी यांनी देखील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत सगळे एकत्र काम करू आणि शिवसेनेशी केलेल्या गद्दारांना पाडू असा निर्धार यावेळी व्यक्त केला.

वाळूच्या भरधाव ट्रॅक्टरने बैलगाडीला दिली धडक

पालकमंत्र्यांवर सावंत बरसले

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर डॉ.संजय सावंत यांनी शाब्दीक टोले बाजी करत, हा कसला सच्चा शिवसैनिक स्वःताला म्हणतो, त्यांनी मी गद्दारी केली असे एक नव्हे तर तब्बल तीन वेळा वेगवेगळे कारण सांगत कबुली दिली आहे. आता मराठा मुख्यमंत्री करायचा होता म्हणून गद्दारी केली असे म्हणतात. मग चिमणराव पाटील मराठाच होते, मग त्यांना त्रास कसा दिला, त्यांना जाहीर बोलण्याची वेळ कशी आणली असे शाब्दीक वार त्यांनी केले.

मेळाव्याला प्रतिसाद.

शिवसेनेकडून शिवगर्जना अभियान राज्यात राबवली जात आहे. जळगाव जिल्हयात देखील शिवर्गजना यात्रा होणार असून यासाठी तयारीसाठी हा मेळावा घेण्यात आला. मेळाव्यास मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातून पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती यावेळी होती. यावेळी अनेक कार्यकर्त्यांचा सह संपर्क प्रमुख संजय सावंत यांच्या हस्ते पक्षात प्रवेश देखील केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या