Saturday, April 26, 2025
Homeमहाराष्ट्रJ. P. Nadda : "देशावर आलेले संकट निवारण्यासाठी आणि...."; जे. पी. नड्डाचं...

J. P. Nadda : “देशावर आलेले संकट निवारण्यासाठी आणि….”; जे. पी. नड्डाचं गणपती बाप्पाला साकडं

पुणे (प्रतिनिधि)

दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये केलेल्या हल्ल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सडेतोड उत्तर दिले जाईल. या संकटातून देश ताकदीने पुढे जाईल. जे दोषी आहेत, त्यांना योग्य उत्तर देण्याकरिता गणपती बाप्पाचा आशीर्वाद मिळो, अशी प्रार्थना भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी शनिवारी दगडूशेठ बाप्पा चरणी केली.

- Advertisement -

पुणे दौऱयावर असताना जे. पी. नड्डा यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे नड्डा यांचे स्वागत व सन्मान मंदिरात करण्यात आला. या वेळी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, राजेश पांडे, ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस व आमदार हेमंत रासने, उत्सवप्रमुख अक्षय गोडसे, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, यतिश रासने, तुषार रायकर, सचिन आखाडे आदी उपस्थित होते. या वेळी ट्रस्टचे सरचिटणीस व आमदार हेमंत रासने यांनी नड्डा यांना ट्रस्टच्या सामाजिक उपक्रमांची माहिती देखील दिली.

नड्डा म्हणाले, काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे सगळा देश हादरून गेला आहे. ज्याप्रकारे आतंकवादी हल्ला झाला, त्याचप्रकारे दोषी असणाऱयांना उत्तर दिले जाईल. या संकटातून देश ताकदीने पुढे जाईल तसेच बुद्धी व शक्तीच्या माध्यमातून भारत या संकटकाळातून बाहेर येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

भारतातून दहशतवादाचे भय निर्वाण होवो…

भारतातून दहशतवादाचे भय निर्वाण होवो… सर्वत्र कायदा सुव्यवस्था अबाधित राहो… परराष्ट्र शक्तींचे निर्वाण होवो… देशबांधवांना सुस्थिती प्राप्त होवो… असा संकल्प करीत त्यांनी ‘दगडूशेठ’ गणपतीला अभिषेक केला.

जे. पी. नड्डा म्हणाले, आज गणपती बाप्पाचे आशीर्वाद घेण्यासाठी मी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात आलो. दहशतवाद्यांनी पेहलगाम मध्ये जे कृत्य केले, त्याला याला सडेतोड उत्तर देण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आमची अपेक्षा आहे. या संकटातून देश ताकतीने पुढे जाईल आणि जे यामागे दोषी आहेत, त्यांना योग्य उत्तर देण्याकरिता गणपती बाप्पाचा आशीर्वाद मिळो. तसेच बुद्धी व शक्तीच्या माध्यमातून भारत या संकटकाळातून बाहेर येईल. याकरिता पंतप्रधान मोदी यांना शक्ती प्रदान होवो, ही प्रार्थना त्यांनी यावेळी केली.

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा बिमोड करून शत्रूला भरपूर चोख उत्तर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शक्ती द्यावी, अशी प्रार्थना गणरायाच्या चरणी केली असल्याचे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी शनिवारी सांगितले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Pahalgam Terror Attack : कागदी घोडे नाचवणे थांबवा, ठोस कारवाई तुम्ही...

0
पुणे(प्रतिनिधी) राज्यकर्ते केवळ कागदी घोडे नाचवत आहेत. पण, आता हे थांबवा. ठोस कारवाई करा. दहशतवाद्यांची ट्रेनिंग सेंटर उद्धवस्त करा, असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष...