Tuesday, November 26, 2024
Homeमनोरंजनअभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस ED च्या रडारवर, 'त्या' प्रकरणात आरोपपत्र दाखल

अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस ED च्या रडारवर, ‘त्या’ प्रकरणात आरोपपत्र दाखल

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसच्या (Jacqueline Fernandez) अडचणींमध्ये वाढ झाली आहे.

अंमलबजावणी संचालनालयाने (ED) जॅकलीनला २१५ कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात आरोपी केले आहे.

- Advertisement -

सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला माहिती होती की, सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrasekhar) खंडणी वसुल करणार आहे.

सुकेश चंद्रशेखरने जॅकलीन फर्नांडिसला १० कोटी रुपयांचे गिफ्ट दिले होते. ईडीने तिची ७ कोटी रुपयांहून अधिकची संपत्ती जप्त केली आहे.

सुकेशने जॅकलीनच्या कुटुंबातील सदस्यांनाही महागड्या भेटवस्तू दिल्याचेही सांगितले जात आहे.

कुटुंबीयांना दिलेल्या महागड्या भेटवस्तूंमध्ये कार, महागड्या वस्तू, तसेच १.३२ कोटी रुपये आणि १५ लाख रुपयांच्या निधीचाही त्यात समावेश आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या