Thursday, May 23, 2024
Homeनगरजाधव पाटील इंडस्ट्रीचे आगीत 3 लाखांचे नुकसान

जाधव पाटील इंडस्ट्रीचे आगीत 3 लाखांचे नुकसान

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव तालुका औद्योगिक वसाहतीमधील जाधव पाटील इंडस्ट्री या प्लास्टिक मटेरिअलच्या कंपनीला आग लागून तीन लाखांचा कच्चा माल जळून खाक झाला आहे.

- Advertisement -

कोपरगाव औद्योगिक वसाहतीमध्ये अभिजित जयवंतराव जाधव यांची प्लॉट नंबर 13 मध्ये प्लास्टिक पॉलिमर आणि ठिबक सिंचन निर्मिती करण्याची कंपनी असून या कंपनीच्या मागील बाजूस कच्चा माल आहे. त्याच ठिकाणी अचानक आग लागली. यामध्ये 5 टन कच्चा माल, पाण्याच्या मोटार, पाईप अशा अनेक वस्तू जळून खाक झाल्या. अंदाजे 3 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे.

आग लागण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. मागील बाजूस महावितरण कंपनीच्या तार गेलेल्या असून शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आगीच्या ठिकाणी अग्निशामक बंब पाचारण केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. आगीवर नियंत्रण मिळवण्यास अग्निशामक दलास यश आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या