Saturday, July 27, 2024
HomeUncategorizedतुलसी विवाहात जागरण-गोंधळ

तुलसी विवाहात जागरण-गोंधळ

दिंडोरी | तुषार झेंडफळे | Dindori

दिंडोरी तालुक्यातील (dindori taluka) चिंचखेड (Chinchkhed) येथे दरवर्षीप्रमाणे बहुचर्चित शाही तुलसीविवाह सोहळा (Tulsi marriage ceremony) गोरज मुहूर्तावर संत लालबाबा यांच्या आशीर्वादाने व पुरुषोत्तम महाराज यांच्या प्रेरणेने साजरा करण्यात येतो.

- Advertisement -

हा तुळशी विवाह (tulsi vivah) पंरपंरेने ज्या प्रमाणे विवाहात जागरण-गोंधळ घालतात त्याच पद्धतीने केला जातो. त्यामुळे पंचके्राशीत हा तुलसीविवाह सोहळ्याची चर्चा असते. यंदा नवतरुण मित्रमंडळाने विवाहनिमित्त जागरण-गोंधळाचा कार्यक्रम करून महिलांसाठी हळदी-कुंकूही आयोजित केले होते.

गोरज मुहूर्तावर विवाह सोहळा 15 ते 20 हजार वर्‍हाडी उपस्थितीत चिंचखेड (Chinchkhed) येथील पुरुषोत्तमनगरीत पार पडला. विवाह सोहळा सुरू होण्यापूर्वी एक तास अश्व नृत्याने उपस्थित पाहुणे मंडळींची करमणूक झाली.

विवाह झाल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. या तुलसी विवाह निमित्ताने रक्तदान शिबिराचे (Blood donation camp) देखील आयोजन करण्यात आले होते. तसेच महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले होते या तुलसी विवाह निमित्त तब्बल 10,000 अधिक लोकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

मुलीचे मामा म्हणून वणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल राजपूत (Assistant Police Inspector of Vani Police Station Swapnil Rajput) तर मुलाचे मामा म्हणून अक्रूर महाराज साखरे हे होते. चिंचखेड येथील तुलसीविवाह सोहळ्यासाठी आलेल्या भाविकांचे सोहळ्याच्या आयोजकांनी, तसेच चिंचखेड ग्रामस्थांनी आभार मानले.

या तुलसी विवाह निमित्त वणी पोलिसांनी तसेच चिंचखेड पोलीस पाटील यांनी बंदोबस्त ठेवला. यावर्षी नवतरुण मंडळाने तुलसीविवाह सोहळ्याचे नियोजन उत्कृष्ट पद्धतीने केले. संत लालबाबा आणि पुरुषोत्तम महाराज यांच्या प्रेरणेने आणि आशीर्वादाने सुरू झालेला चिंचखेड येथील विवाह सोहळा नक्कीच कौतुकास्पद आहे, असे वणी पोेलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्निल राजपूत यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या