Saturday, May 4, 2024
Homeनाशिकनाशिकरोड : कैद्याने कारागृह पोलिसाच्या कानशिलात लगावली

नाशिकरोड : कैद्याने कारागृह पोलिसाच्या कानशिलात लगावली

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road

येथील मध्यवर्ती कारागृहात (Central Jail) एका कैद्याने (Prisoner) कारागृह पोलीस कर्मचाऱ्यांच्या कानशिलात लगावल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर संबंधित पोलीस कर्मचाऱ्याने नाशिकरोड पोलीस ठाण्यात (Nashik Road Police Station) संबंधित कैद्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे…

- Advertisement -

मोठी बातमी! विधानसभा अध्यक्षांनी शिवसेनेच्या ४० आमदारांच्या अपात्रतेबाबत घेतला ‘हा’ निर्णय

याबाबत अधिक माहिती अशी की, येथील मध्यवर्ती कारागृहात रुपेश आनंदा पवार हे पोलीस (Police) कर्मचारी असून दोन दिवसांपूर्वी ड्युटीवर असतांना साडेतीन वाजेच्या सुमारास कारागृहातील सर्कल क्रमांक आठ मधील कैदी अमर मारुती माळी हा कोणाची परवानगी न घेता क्रमांक सहा मधील सर्कलमध्ये त्याचा कैदी मित्र राहुल सुनील खंडारे यास भेटण्यासाठी आला व बोलू लागला.

Uddhav Thackeray Interview : मुलाखतीतून उद्धव ठाकरेंचा शिंदे गट, भाजपवर हल्लाबोल तर अजित पवारांवर स्तुतीसुमनं… वाचा संपूर्ण मुलाखत जशीच्या तशी!

यावेळी ड्युटीवर असलेल्या रुपेश पवार यांनी माळी यास ‘तू या सर्कलमध्ये कसा काय आला, परवानगी घेतली का? अशी विचारणा केली असता पवार यांच्या बोलण्याचा माळी यास राग आला. त्यानंतर तुम्हाला काय करायचे आहे ते करा मी जाणार नाही असे बोलून कैदी अमर माळी याने पोलीस कर्मचारी आनंद पवार यांच्या कानशिलात लगावली.

PM मोदींनी चार वर्षांपूर्वीच केली होती आजच्या अविश्वास प्रस्तावाची भविष्यवाणी, पाहा VIDEO

दरम्यान, या घटनेनंतर कारागृहातील इतर कैदी आले व त्यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. सदर घटनेप्रकरणी कारागृह पोलीस कर्मचारी रुपेश पवार यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल (Complaint Filed) केली असून पुढील तपास सुरू आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या